spot_img
spot_img

Latest Posts

इंडिया आघाडीचे फोटोसेशन सुरु ,कोण उभे आहेत कोणत्या रांगेत…

गेल्या काही दिवसांपासून भाजप विरोधात अनेक पक्ष एकत्र आलेले बघायला मिळत आहे. आणि या एकत्र पक्षामध्ये तब्बल २८ पक्ष हे दिसून आले आहेत. अनेक दिवसांपासून INDIA पक्षाच्या बैठकीच्या चर्चाना उधाण आले होते आणि आता आपण ज्याची वाट बघत होतो तो क्षण आता येऊन ठेपला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप विरोधात अनेक पक्ष एकत्र आलेले बघायला मिळत आहे. आणि या एकत्र पक्षामध्ये तब्बल २८ पक्ष हे दिसून आले आहेत. अनेक दिवसांपासून INDIA पक्षाच्या बैठकीच्या चर्चाना उधाण आले होते आणि आता आपण ज्याची वाट बघत होतो तो क्षण आता येऊन ठेपला आहे. INDIA या नवीन पक्षाची आज मुंबई मध्ये सभा होणार आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक येऊ घातली आहे. या मध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, लालू प्रसाद यादव यांच्यासह देशभरातील महत्वाचे नेते हॉटेल ग्रँड हयातमध्ये पोहोचले आहे. या बैठकीवेळी अचानकपणे एका बड्या नेत्याची एन्ट्री झाली. या नेत्याच्या येण्याने या बैठकीतील नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली. देशाच्या राजकारणाची जाण असलेले वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी या बैठकीत हजेरी लावली. काही दिवसांआधी कपिल सिब्बल हे काँग्रसमधून बाहेर पडले आहेत. आता त्यांनी अशी अचानकपणे लावलेली हजेरी चर्चेत आली आहे.

देशातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये सुरू आहे. आज बैठकीचा दुसरा दिवस असून इंडिया आघाडीचा लोगो आणि संयोजक ठरवण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर नेत्यांच्या फोटोसेशनमध्ये पहिल्या रांगेत अनेक नेत्यांना स्थान मिळाले आहे. राहुल गांधी दाटीवाटीत उभे राहिल्याचं दिसत आहे.दरम्यान, इंडिया आघाडीच्या फोटोसेशनमध्ये पहिल्या रांगेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, मेहबुबा मुफ्ती, अरविंद केजरीवाल, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, लालुप्रसाद यादव, एम. के. स्टॅलिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, फारूक अब्दुल्ला या नेत्यांचा सामावेश आहे. तर राहुल गांधीही पहिल्याच रांगेत उभे आहेत पण ते इतर नेत्यांच्या दाटीवाटीत उभे असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे.

तर दुसऱ्या रांगेमध्ये सुप्रिया सुळे, जयंत पाटील, आदित्य ठाकरे, उमर अब्दुल्ला हे उपस्थित आहेत. त्याचबरोबर काही नेते दुसऱ्या आणि काही नेते तिसऱ्या रांगेत उभे आहेत. विशेष म्हणजे संजय राऊतांना पहिल्या रांगेत स्थान मिळाले आहे.इंडिया आघाडीच्या संयोजक पदावरून वाद निर्माण होण्याची शक्यता इंडिया आघाडीच्या संयोजक पदावरून वाद निर्माण होणार आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावावर काँग्रेस आग्रही असून काँग्रेसने संयोजक पद न घेता आपलं मोठं मन दाखवावं असं कम्युनिस्ट पार्टीसह इतर पक्षांचे म्हणणे आहे. या पदासाठी ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांच्या नावाचीसुद्धा चर्चा आहे पण खर्गे यांच्याकडे एक दलित चेहरा म्हणून पाहिलं जात असल्यामुळे संयोजक पदासाठी त्यांच्या नावाचीच जास्त चर्चा आहे.

हे ही वाचा:

मुंबईतील ठाकरे गटाचे नेते सुधीर मोरे यांनी केली आत्महत्या

Asia Cup 2023, भारताविरुद्ध सामना व्हायच्या आधीच पाकिस्तानला मोठा धक्का, शाहिन आफ्रिदी दुखापतग्रस्त…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss