जोगेश्वरी पूर्व, सुभाष रोड येथे रेल्वे लगत असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या त्रस्त नागरिकांच्या वतीने आज सकाळी “बिराड मोर्चा” काढण्यात आला. हा मोर्चा सकाळी ११ वाजता लोकांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या मुलभूत हक्कांसाठी काढण्यात आला. मोर्चाचा उद्देश झोपडपट्ट्यांवरील अन्याय, पुनर्वसनाच्या मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधणे आणि रेल्वे प्रशासनासोबत चर्चा घडवून आणणे हा होता.
या शांततापूर्ण मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, आणि लहान मुलांनी सहभाग घेतला होता. परंतु मोर्चा पुढे जात असताना पोलिसांनी अनपेक्षितपणे लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक महिला व जेष्ठ नागरिकांना दुखापत झाली आहे. मोर्चेकरांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन जोगेश्वरी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. नागरिकांचे आरोप पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता लाठीचार्ज केला.शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या महिलांवर आणि वृद्धांवर जबरदस्ती केली गेली.आंदोलन चिरडण्याचा हा प्रयत्न असून यामुळे लोकांच्या आवाजाला दाबले जात आहे.
नागरिकांची मागणी शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार देण्यात यावा. लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.झोपडपट्टीतील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. आंदोलनकाऱ्यांचे निवेदन “आम्ही कोणत्याही प्रकारे हिंसा केली नाही. आम्ही फक्त आमच्या हक्कांसाठी आणि पुनर्वसनाच्या मागणीसाठी शांततापूर्ण मार्गाने मोर्चा काढला होता. पोलिसांचा लाठीचार्ज हा लोकशाहीच्या मूल्यांविरोधातील कृती आहे. आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.” न्यायासाठी लढा सुरूच या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत तक्रार दाखल करण्यात येणार आहे. मोर्चाचे आयोजक पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी चर्चा करत आहेत.
हे ही वाचा :
Davos Investment : Tata Group करणार ३०,००० कोटी गुंतवणूक- CM Devendra Fadnavis
Davos मध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट, पहिला करार राज्यातील Gadchiroli साठी