शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याची आमची भूमिका आहे असे मत व्यक्त केले. भारतीय जनता पार्टीची राज्यात ताकद मोठी आहे हे आम्ही मान्य करतो त्याच खालोखाल शिवसेनेची ताकद देखील मोठी आहे. भविष्यात देखील आम्ही महायुती म्हणून लढू आणि राज्यातील सर्व निवडणुका एकत्र लढू असे आम्हाला वाटते. स्थानिक लेवलला काही नेत्यांची कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आम्ही त्यावर विचार करू. काही नेते मंडळी एकला चलो ची भूमिका घेत असले तरी आमची भूमिका महायुती म्हणून एकत्र लढण्याची आहे, असे म्हणाले.
तसेच त्यांनी संजय राऊतांबद्द्दल बोलताना म्हणाले,” संजय राऊत यांच्याकडून गेल्या अनेक वर्षांपासून भरपूर धडे घेतले आहेत. काँग्रेसकडे सर्व मराठी माणसे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळतील या आशेने बघत होते, परंतु ते त्यांनी केलं नाही. मात्र, नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी ते करून दाखवलं. संजय राऊत जे बोलतात नेहमी त्याच्या उलट केलं जातं, सामंत आणि एकनाथ शिंदे यांचे मी ठाणेकर नागरिकांच्या वतीने अभिनंदन करतो.”
प्रताप सरनाईक यांना केबल कार आणि दफन भूमीबद्दल बोलताना स्पष्ट केले की, ” येऊरला रोपवे व्हावी अशी मागणी मी केली नाही, एकनाथ शिंदे यांच स्वप्न आहे. ठाण्यातच नव्हे तर एमएमआर क्षेत्रामध्ये वाहतूक कोंडी भविष्यात होता कामा नये. तसेच सदर दफनभूमीची जागा सर्व समाजाची असून ती बालाजी एंटरप्राइजेस कंपनीने ठाणे महानगरपालिकेला दिली होती. कन्स्ट्रक्शन टीडीआर च्या बदल्यात त्या ठिकाणी डेव्हलपमेंट देखील चालू केली आहे. अगोदर त्यांनी विहंग कंपनीवरती खटला दाखल केला होती, कालच्या प्रिटीशनमध्ये विहंगच नाव काढून बालाजीचं नाव टाकलं आहे.”
हे ही वाचा:
आपली पापं झाकण्यासाठी ते ओबीसींच्या मागे लपतात; जरांगेची Dhanjay Munde यांच्यावर टीका
राम कमलच्या “बिनोदिनी” तील “कान्हा” गाण्यासाठी श्रेया घोषालच्या आवाजाची जादू