मुंबई महापालिकेचा २०२५-२६ चा ७४४२७.४१ कोटींचा अर्थसंकल्प आयुक्त भूषण गगराणी यांनी सादर केला आहे. अर्थसंकल्पीय अंदाज गेल्या वर्षीच्या तुलनेत १४.१९ टक्क्यांनी वाढला आहे. २०२४-२५ च्या बजेटमध्ये ६५ हजार १८० कोटींच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या. तर आता २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे बजेट ७४ हजार ४२७ कोटी इतकं आहे. कचरा संकलन कर संदर्भात अद्याप निर्णय नाही, कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.
https://youtu.be/EIAOAzpho7I?si=JMDc5gWBRh-r3ZSb
कोणत्या कामासाठी किती खर्चाची तरतूद
- दहिसर ते भाईंदर पर्यंतच्या कोस्टल रोड प्रकल्प करिता २०२५-२६ चा अर्थसंकल्पीय अंदाज मध्ये ४३०० कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.
- रस्ते व वाहतूक खात्याकरिता २०२५-२६ या अर्थसंकल्पीय अंदाज मध्ये ५१०० कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.
- गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरिता १९५८ कोटी इतकी तरतूद केली.
- मुंबई महापालिका आरोग्य खात्याचे बजेट ७३७९ कोटी आहे.
- मुंबई महापालिका शिक्षण खात्याचं यंदाच्या वर्षीचं बजेट ३९५५ कोटी रुपये इतके असेल.
- मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झोपडपट्टीतील गाळेधारकांना मुंबई महापालिका कर भरावा लागणार आहे.
- मिशन व्हिजन २७,मिशन संपूर्ण हे दोन मिशन मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्याकडून राबवले जाणार आहेत.
- झोपडपट्टीतील व्यावसायिक गाळेधारकांना कर लागणार आहे. झोपडपट्टीतील गाळेधारकांकडून सुमारे ३५० कोटी इतका महसूल अपेक्षित आहे.
मुंबईच्या पर्यटनवाढीसाठी महापालिकेच्या नव्या योजना
- मुंबई शहरातील कोळीवाड्यांच्या विकासासाठी २५ कोटी देण्यात येणार आहेत.
- राणी बागेचं नवं आकर्षण म्हणून पेंग्विन्स आणि वाघानंतर जिराफ, झेब्रा, सफेद सिंह, जॅग्वार या विदेशी प्रजातीचे प्राणी आणले जाणार आहेत.
- मुंबई शहरातील संजय गांधी नॅशनल पार्कच्या जमिनीखालील बोगद्यात वाघाचे शिल्प उभारले जाणार आहेत.
- लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय उभारले जाणार आहेत.
- काळा घोडा आणि रिगल जंक्शन परिसराचा विकास केला जाणार आहे.
हे ही वाचा :
आरोग्य, गृहनिर्माण व पाणी पुरवठा विभागाच्या योजनांना गती देण्याचे CM Devendra Fadnavis यांचे निर्देश
महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटींची तरतूद
Follow Us