वांद्राच्या भारत नगरमध्ये आंदोलन करण्यात आले. एसआरएकडून अनधिकृत बांधकाम पडलं जाणार आहे. त्यावरून इथे मोठा तणाव निर्माण झाला आहे. एसआरएचे अधिकारी जेसीबी सह दाखल झाले होते. पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील इथे तैनात करण्यात आता होता. वांद्रे पूर्वचे आमदार वरून सरदेसाई इथे दाखल झाले होते. इथे राहणारे नागरिक आक्रमक झाले असून प्रशासन आणि नागरिकांमध्ये राड्याची स्थिती निर्माण झाली होती.
परवा मी अख्खा दिवस एसआरएच्या ऑफिसमध्ये होतो. मी सांगत होतो, हे करु नका. लोकांच्या रोषाला सामोर जावं लागले. लोकांचा रोष तुम्ही पाहू शकता, लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्याला मी तडा जाऊ देणार नाही. ही माझी जबाबदारी आहे. अदानी ग्रुप हा केवळ पैशाने विकत घेऊ शकतो. लोकांना विकत घेऊ शकत नाही. मी थांबलो, तर गर्दी वाढत जाईल, पोलीस कमी पडतील. असं कृपया करु नका. मी कळकळीची विनंती करतो असं स्थानिक आमदार वरुण सरदेसाई म्हणाले.
मी मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण फक्त आश्वासन मिळाली. दीडशे-दोनशे पोलीस घेऊन येऊ नका. विकास करण्याआधी लोकांना विचारा. त्यांना विश्वासात घ्या. तोडणाऱ्या 180 घरांसोबत कुठलाही करार झालेला नाही. तुम्ही मानवतेला धरुन हे काम करत नाहीयत” असं वरुण सरदेसाई म्हणाले.
एसआरएस काय म्हणतो
स्थानिक आणि त्यांचे वकील एसआरए, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुप्रीम कोर्टाची कागदपत्र दाखवण्याचा प्रयत्न करतायत. पण एसआरएचे अधिकारी काहीही ऐकून घेण्याच्या स्थितीत नाहीत. कारण ग्राऊंड प्लस फाय अशा पद्धतीने इथे झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. एसआरए, महापालिका कधीच अशी परवानगी देत नाही. नागरिकांकडे पुरावे नाहीत, असं एसआरएसच म्हणणं आहे.
नागरिकांचं काय म्हणणं आहे
वांद्रेपूर्वेला आधी एचडीआयएल दीवाण बिल्डरचा प्रकल्प सुरु आहे. 97-98 साली सुरुवात झालेली. आज 25-26 वर्ष होऊनही लोकांना घर मिळालेलं नाही. दीवाण जेलमध्ये गेल्यानंतर अदानी आला. आज अदानीची इथे गुंडागर्दी सुरु आहे. कुठलाही करार न होता थेट नोटीस येते. आम्ही ही तोडकारवाई होऊ देणार नाही अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. आमची तिसरी पिढी इथे राहतेय. पैसा देत नाही, दुसरं घर देत नाही, थेट नोटीस. आम्ही कधीच अशा तोडककारवाईला परवानगी देणार नाही असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे.
हे ही वाचा:
रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने शिवानी-अंबरचं केलं केळवण; कलाकारांनी शेयर केले फोटो
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.