Saturday, December 2, 2023

Latest Posts

RAILWAY MEGABLOCK: कुठे असणार MEGABLOCK? जाणून घ्या.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कुर्ला स्थानकांदरम्यान विशेष उपनगरीय गाड्या धावणार आहेत. तसेच, ठाणे वाशी नेरूळ स्थानकात दरम्यान ट्रान्स हार्बर लाईन सेवा सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे.

दिवाळीच्या निमित्ताने शॉपिंगसाठी आजचा दिवस खास मानला जाणार आहे. कारण, आजचा दिवस म्हणजे रविवार हा सुट्टीचा दिवस आहे. जर दिवाळी शॉपिंगसाठी तुम्ही घराबाहेर पडण्याचा विचारात असाल, तर आधी ही बातमी वाचणे गरजेचे आहे. घरातून निघण्यापूर्वी प्रवासाचे नियोजन करणे आज गरजेचे ठरणार आहे. कारण, आज मुंबई लोकलच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेच्या कामांमुळे आधीपासूनच मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच, आज मध्य आणि हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक असणार आहे.

माटुंगा आणि भायखळा या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. तर हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी या मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. रेल्वे मार्गाचे काम सुरू असल्याने तीनही मार्गांवर मेगाब्लॉक आज ठेवण्यात आला आहे. माटुंगा ते भायखळा आणि कुर्ला ते वाशी दरम्यान आज मध्यरात्री तसेच दिवसा रेल्वेने ब्लॉक घोषित केला. लोकलच्या फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. तसेच, आज या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मालिकेच्या कामांमुळे ११० लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. पश्चिम रेल्वेवर खार ते गोरेगाव दरम्यान सहाव्या मालिकेच्या कामासाठी सुरू असलेल्या ब्लॉकचा आज शेवटचा दिवस आहे.

आज ११० लोकल फेऱ्या रद्द असणार आहेत. तसेच, सोमवारपासून पश्चिम रेल्वे मार्गावर नियमितपणे लोकल धावणार आहेत लवकरच, सहावी मार्गिका प्रवाशांच्या सेवेत येणार असल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या माटुंगा ते भायखळा दरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. दादर येथे प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर दुहेरी थांबा देण्यात येणार आहे. या काळात नियोजित आगमनापासून दहा ते पंधरा मिनिटे गाड्या उशिराने धावणार आहेत. ब्लॉक कालावधी डाऊन मेल एक्सप्रेस माटुंगा ते भायखळा दरम्यान डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात येणार आहेत आणि दादर येथे प्लॅटफॉर्म क्रमांक एक व दुहेरी थांबा देण्यात येईल. यासोबतच इगतपुरी लोणावळा आणि रोहा येथे त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा दहा ते पंधरा मिनिटे गाड्या उशिराने पोहोचतील.

हार्बर मार्गावर कुर्ला आणि डाऊन मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून पनवेल बेलापूरसाठी आणि पनवेल ते बेलापूर होऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप आणि डाऊन मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कुर्ला स्थानकांदरम्यान विशेष उपनगरीय गाड्या धावणार आहेत. तसेच, ठाणे वाशी नेरूळ स्थानकात दरम्यान ट्रान्स हार्बर लाईन सेवा सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे.

हे ही वाचा : 

AJIT PAWAR यांनी मुख्यमंत्री व्हावे, मातोश्रींची इच्छा

MAHARASHTRA: सणासुदीच्या काळात एसटीला फटका बसण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss