Raj Thackeray Prabhadevi Speech Live :
मुंबई समाज संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम ही सुरू आहे निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. संपूर्ण राज्यभरात दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत आणि पुढे तीन दिवसांनीच म्हणजेच 23 नोव्हेंबर 2024 रोजी या निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे जोरदार प्रचार आता सगळ्याच पक्षांकडून सुरू झाले आहेत. अशातच राज्यात नवनवीन घडामोडी देखील सध्या घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे
यावेळी बोलत असताना निवडणुक आयोगाने कमी कालावधी हातात दिला आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी पोहचणे कठीण होत आहे. फक्त १४-१५ दिवस दिले आहे. सगळे सिग्नल मोडून सभेला यावं लागलं आहे. मुंबईतल्या मुंबईमध्ये पोहचता येत नाही तर महाराष्ट्रात कुठे पोहचायच? या परिसरात सामना मुळे माझा बराच काळ इथे गेला आहे. आतमध्ये येत असताना जुन्या गोष्टी आठवत होत्या मला. माझंही वडील आणि बाळासाहेब यांनी मिळून पाहिलं मार्मिक हे पहिलं साप्ताहिक चालू केलं. ज्या मार्मिक मधून शिवसेना निर्माण झाली आणि ज्या शिवसेनेमधून सामना निर्माण झाला तो देखील प्रभादेवीमध्येच झाला. हा संपूर्ण भाग जुन्या आठवणी उजळायला लावत आहे.
घरात १९२२ साली पाक्षिक हे प्रबोधन नावाने सुरु केलं. केशव सीताराम ठाकरे यांचं प्रबोधन हे पाक्षिक चालू केलं होत. आणि मग आजोबाना लोक प्रबोधनकार म्हणून ओळखू लागले. पत्रकारिता, व्यंगचित्रकार हे सर्व घरात होते. १९६० साली दादरमध्येच मार्मिक हे साप्ताहिक चालू केलं. तेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा काळ होता. त्या काळात आचार्य आत्रेची दोन वर्तमानपत्र होती एक मराठा आणि एक नवयुग. आणि मराठामध्ये बाळासाहेब व्यंगचित्र करत आणि नवयुगमध्ये माझे वडील व्यंगचित्र करत होते. हा सर्व इतिहास आहे. हे सर्व करत करत मार्मिक ची सुरुवात झाली. वाचा आणि थंड बस असं एक सादर होते. मराठी माणसासंदर्भात सादर होत त्यामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आणि त्यानंतर वाचा आणि उठा हे चालू झाले. आणि त्यातून माझ्या आजोंबानी बाळासाहेबांना विचारलं सगळीकडे भाषण देतो त्याच पुढे काय तेव्हा पुढे शिवसेना चालू झाली. आणि यातून एक संघटना उभी राहिली एक पक्ष उभा राहिला आणि त्यातून आम्ही सर्व उभे राहिलो. आणि तेव्हा व्यंगचित्रकार म्हणून मार्मिक मध्ये सुरुवात झाली. आणि त्यानंतर मला महाराष्ट्र मला समजायला लागला. महाराष्ट्र बद्दलचे प्रेम, त्याग, महाराष्ट्र किती मोठा , त्याचा अभिमान, स्वाभिमान अश्या सर्व गोष्टी त्यातून समजायला लागल्या. आणि १९८५ साली बाळासाहेब अंडी माझ्या वडिलांनी व्यंगचित्र काढणं बंद केलं आणि संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली.
१९८८ साली सामना आला. हे सर्व तुम्हाला सांगायचं म्हणजे या सर्व गोष्टींची सुरवात ही प्रबोधनकार ठाकरे यांनी केली. त्याच्यानंतर श्रीकांत ठाकरे , बाळासाहेब ठाकरे मग आमही सर्व… त्या माहीम प्रभादेवी मध्ये मार्मिक – शिवसेनेची – सामानाची सुरुवात झाली. १९९५ साली जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा माझ्या महाराष्ट्रात १७५ सभा झाल्या होत्या. अनेकांसाठी सभा झाल्या होत्या . तेव्हा एकसाठी इथे सुद्धा सभा झाली होती. हा सर्व ठाकरेंचा प्रवास हा दादर – प्रभादेवी – माहीम मध्ये झाली आहे. हि आमची मूळभूमी. आजपर्यंत जे घडलं नाही ते आता घडतंय. आमच्या तीन पिढ्या लिखाण – व्यंग चित्र काढणं या सर्व गोष्टींमध्ये गेल्या. पण याच दादर – माहीम – प्रभादेवी परिसरातून पहिल्यांदा ठाकरे उभा राहत आहे.
अमित ठाकरे साठी ही राज ठाकरे यांनी पहिली सभा घेतली आहे. यावेळी वेळी बोलत असताना ते म्हणाले आहेत की, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडावायचा आहे. त्यावेळी २००६ ला मी शिवसेमधून मी बाहेर पडलो आणि हा वाद शिवसेनेशी नाहीय. हा वाद भ*** सोबत आहे. अनेक लोकांनी शिवसेना सोडली. पण मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलोय. मला ही गोष्ट पटत नाही. माझी घुसमट होते. तेव्हा त्यांनी मला हात दाखवले आणि शेवटची मिठी मारली आणि जायला सांगितलं. मला तो पक्ष फोडून काही करायचं न्हवत. जर माझ्यात ताकद असेल तर मि स्वतःचा पक्ष निर्माण करेल आणि त्यातून पुढची मी वाटचाल करेल . त्यामुळे धोका देऊन मी बाहेर पडलो नाही. मी परिवाराच्या आड राजकारण कधी येऊ दिल नाही. वरळीत आदित्य उभा राहिला तिथे ३७ – ३८ हजार मनसेची मत आहेत तेव्हा मि म्हंटल आमचा कुटुंबातून पहिल्यांदा उभा राहिला आहे.