शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे नाराज असल्याची चर्चा आहे. ते भाजपच्या वाटेवर असल्याचेही बोलले जाते. त्यात त्यांनी आपण नाराज नाही. पक्ष बदलणार नाही असे त्यांनी म्हंटलं होतं. त्यावर विनायक राऊत म्हणाले की, राजन साळवी यांना मातोश्रीवर बोलावले आहे. विधानसभा निवडणूक वेळी लांजा किंवा राजापूरमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभा लावल्या होत्या. पण त्या त्यांनी नाकारल्या होत्या. राजन साळवी उद्धव ठाकरे यांना कधीही फोन करून बोलू शकतात. राजन साळवी यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत. राजन साळवी पक्षाशी कायम प्रामाणिक राहतील.
पुढे ते म्हणाले, “पैसा आणि सत्तेच्या जोरावर सध्याचे राजकारणी विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलावत आहेत. ज्यांनी स्वतःला विकायला ठेवले आहे त्यांचं सोडा, पण निष्ठावंतांच्या जोरावर शिवसेना पुन्हा गरुड झेप घेईल. पक्ष वाढवणे आणि सांभाळणे ही जबाबदारी आदित्य आणि उद्धव ठाकरे मेहनतीने करत आहेत. काही जणांना रेडिमेट कार्यकर्ते मिळून पक्ष वाढवला जात असेल तर त्याला काही करू शकत नाही.
आत्ताच्या निवडणुका मेरीटवर होत आहेत का? या प्रश्नावर विनायक राउत यांची प्रतिक्रिया होती की, सध्याची इलेक्शन प्रोसिजर ही करप्ट इलेक्शन प्रोसिजर आहे. बॅलेट पेपर वरच निवडणुका झाल्या पाहिजेत. आता चिटसोबत सरसकट पाकिट दिले जाते. निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून वारेमाप वापर. ते आव्हान इतर पक्षांसोबत शिवसेनेसमोर देखील आहे. मुंबई महानगरपालिकेला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरू आहे. आम्ही कामाला सुरुवात केली आहे. मुंबई वाचवण्यासाठी मुंबईकर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ताब्यात महानगरपालिका देतील. स्वबळाची तयारी हा नंतरचा प्रश्न आहे. मुंबईचा महापौर हा परप्रांतीय असेल असा भाजपने जाहीर केल आहे. मुंब्रातील मराठी वादावर राऊत यांचं उत्तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय मराठी माणूस राहणार नाही.
हे ही वाचा:
Mahakumbh 2025: कुंभमेळ्याला जायचयं? भारतीय रेल्वेकडून खास संधी! विशेष गाड्यांचे नियोजन…
तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असेल ? संभाव्य पालकमंत्री यादी आली समोर