देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्र राजभवन येथे राष्ट्रध्वज फडकावून ध्वजाला मानवंदना दिली. राष्ट्रगीत तसेच राज्यगीत झाल्यानंतर राज्य राखीव पोलीस दल व महाराष्ट्र पोलीस दलातर्फे सलामी देण्यात आली. राज्यपाल राधाकृष्णन यांनी पत्नी सुमती यांचेसह राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व उपस्थित लहान मुलांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मिठाई वाटप केले.
संचलनात विविध पथकांचा सहभाग
यावेळी झालेल्या संचलनात भारतीय नौदल, गोवा पोलीस, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी-६० पथक, गृहरक्षक दल (पुरुष), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, गृहरक्षक दल (महिला), राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा, नागरी संरक्षण दल (पुरुष/ महिला), राष्ट्रीय सेवा योजना (मुले/मुली) एम.सी.एम गर्ल्स हायस्कूल काळाचौकी, सी. कॅडेट कोअर (मुली), सी. कॅडेट कोअर (मुले), रोड सेफ्टी पेट्रोल (मुली) रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर मुंबई, रोड सेफ्टी पेट्रोल (मुले) डॉ. अँटोनिओ डासिल्वा हायस्कूल दादर, मुंबई, रोड सेफ्टी पेट्रोल (मुली) अंजुमन ए इस्माईल हायस्कूल, बांद्रा मुंबई, रोड सेफ्टी पेट्रोल (मुले) रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर मुंबई, रोड सेफ्टी पेट्रोल (मुली) मनपा शाळा पंतनगर, घाटकोपर (पूर्व) मुंबई, रोड सेफ्टी पेट्रोल मनपा माणिकलाल एम. पी. एस इंग्लिश हायस्कूल, घाटकोपर मुंबई, स्टुडन्ट पोलीस कॅडेट (मुले-मुली) बृहन्मुंबई महानगरपालिका ब्रास बँड पथक, पाईप बँड पथक, महिला निर्भया वाहन पथक, नौदलाची वाहने, अग्निशमन दलाची वाहने आदींनी सहभाग घेतला. कमांडर सुमितसिंग चौहान हे संचलन प्रमुख होते.
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा
भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योगकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे झालेल्या शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी जिल्हाधिकारी रवि कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम कारभारी, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, अधिकारी, कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत वीर पत्नी यांचा सत्कार मंत्री लोढा यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच विविध विभागातील वैशिष्ट्यपूर्ण कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन
भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी ध्वज फडकवून भारतीय तिरंग्यास वंदन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करून राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
हे ही वाचा :