नुकताच उघडकीस आलेला टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणामध्ये नवी मुंबईतील नागरिकांची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. टोरेस ज्वेलरीच्या माध्यमातून महिन्याला जवळपास ४४ टक्के परतावा देण्याचं आमिष लोकांना दाखवण्यात आले. यामध्ये जवळपास सव्वा लाख नागरिकांनी गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. हा सादर घोटाळा एक हजार कोटींचा असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी फरार असलेल्या तौसिफ़ रियाजने एक रिपोर्ट दिला. त्यामध्ये सर्वेश सुर्वे याच्या पत्राचा देखील उल्लेख केला आहे.
सर्वेश सुर्वे प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संचालक होता. तो म्हणाला होता की, कंपनी भारतात रिटेल ज्वेलरी बिझनेस व्यवसायात काम करेल, असे त्याला संगितले गेले. विदेशी व्हिसा आणि रोजगार उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, त्यामुळे कंपनीचा संचालक आणि भागधारक झालो. सर्वेश सुर्वे म्हणाला की, मुंबईच्या दादर भागात टोरेस ब्रँड नावानं कंपनीने ज्वेलरी शोरूम लॉंच केलं. सुर्वेने संचालक पदावर असूनही इतर कोणत्याही शोरूमच्या कामात सहभागी नसल्याचे म्हटले. कंपनीने उच्च बोनस, कॅशबॅकसह २०० ते ६०० टक्के रिटर्न देण्याचं आश्वासन देत लोकांकडून पैसे घेण्यास सुरुवात केली. त्या बदल्यात ग्राहकांना दागिन्यांऐवजी कमी गुणवत्ता असलेल्या मोईसॅनाईटचे दगड दिले. ही कंपनी १३.७६ कोटींच्या बोगस लोन व्यवहारात सहभागी होती.
सर्वेश सुर्वे पुढे म्हणाला की, २७ डिसेंबरला त्याला कंपनीच्या लोअर परेल कार्यालयात बोलावले गेले. तिथे काही कागदपत्रावर सही करण्यासाठी दबाव टाकला गेला. कर्ज करारावर सही करण्यास नकार दिला तेव्हा धमकी दिली गेली आणि मारहाणही करण्यात आली. कंपनीने तुर्कीतून ७५ किलो सोनं आणि २५ किलो चांदी बेकायदेशीर आणली गेल्याचा दावा सुर्वेकडून करण्यात आला. ते सोनं मुंबईच्या काळंबादेवी परिसरातील एका ज्यूसवर दुकानावर पोहोचवले गेले. याचे पुरावे असून तस्करी झालेल्या सोन्याचे फोटो देखील आहेत असे सर्वेश सुर्वे म्हणाला.
हे ही वाचा:
वाल्मिक कराड पडला CID कोठडीत आजारी, उपचार सुरु
Bigg Boss 18 : धनश्रीसोबत घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, युझवेंद्र चहल बिग बॉसमध्ये प्रवेश करणार!