spot_img
spot_img

Latest Posts

नवी मुंबईत आफ्रिकन नागरिकांकडून अंमली पदार्थांची विक्री

नवी मुंबई (Navi Mumbai) अंमली पदार्थांचं जाळ अनेक वर्षपासून पसरलं आहे. या अंमली पदार्थांच्या जाळ्यात आफ्रिकन (African) नागरिकांचा समावेश आहे.

नवी मुंबई (Navi Mumbai) अंमली पदार्थांचं जाळ अनेक वर्षपासून पसरलं आहे. या अंमली पदार्थांच्या जाळ्यात आफ्रिकन (African) नागरिकांचा समावेश आहे. शांत शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईत अनेक मोठ्या शाळा, कॉलेज , उच्च शिक्षणाच्या संस्था आहेत. तर दुसरीकडे नवी मुंबई ही आयटी हब ( IT Hub) म्हणून देखील ओळखली जाते. पुण्यानंतर नवी मुंबई ही आयटी हब (IT Hub) आणि एज्यूकेशन हब (Education Hub) म्हणून देखील ओळखले जाते. नवी मुंबईतील तरुणांना ड्रग्सच्या (drugs) जाळ्यात ओढण्याचे काम हे आफ्रिकन नागरिक करत आहेत. अंमली पदार्थाचे जाळे पसरू पाहणाऱ्या आफ्रिकन नागरिकांवर नवी मुंबई पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक (Surgical strike) केला आहे. नवी मुंबईतील ६ ठिकाणाहून टाकलेल्या छाप्यात १४ आफ्रिकन नागरिकांना पकडण्यात आले आहे. त्याच्याकडून ५ कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

ड्रग्जच्या जाळ्यातून नवी मुंबईला वाचवण्यासाठी पोलीस आयुक्त मिलींद भारांबे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ड्रग्जचा धंदा करणाऱ्यावर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. ६ ठिकाणी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी ७५ आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेतले आहे. त्यातील १४ नागरिकांकडे ड्रग्ज सापडले आहेत. ८९८ किलो कोकेन (Cocaine), ३०० ग्राम एमडी (MD), ट्रायमॅाल हायड्रोक्लोराईडच्या (TRIMAL HYDROCHLORIDE) ३६ हजार ६४० ट्रॅप्स असा ५ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमली पदार्थांची विक्री कारण्यासाठी वापरण्यात आलेल्या गाड्या , मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. बेकायदेशीरपणे भारतात आलेल्या ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३२ जणांना नोटीस देऊन भारतातुन हद्दपार करण्यात येणार आहे. या कारवाईसाठी ६०० जणांचा स्टाफ वापरण्यात आला आहे.

मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची विक्री केली जात आहे. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने आलेल्या परदेशी नागरिकांकडून ड्रग्जची विक्री केली जात आहे. शहरात मोठ्या प्रमणावर आयटी क्षेत्र, भरगोस पगार असलेल्या नोकऱ्या त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची तस्करी वाढली आहे. पुण्यात मागील तीन वर्षपासून ८ कोटींचा माल जप्त केला आहे. गोवा, मुंबई येथून आलेली कोकेन, ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे शहरात पाणी कपात होणार की नाही ? बैठकीत पालकमंत्र्यांनी घेतला निर्णय…

राज ठाकरे यांनी साधला फोनवरून आंदोलकांशी संवाद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss