spot_img
spot_img
Monday, September 25, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात उभारणार शिंदे गटाच्या विकास कामांची दहीहंडी !

आज एकीकडे सत्ताधारी पक्ष असलेला शिवसेनेचा शिंदे गट आणि विरोधात बसलेले उद्धव ठाकरे गटामध्ये शाब्दिक चकमक रंगत असताना थेट शिवसेना सचिव सुशांत शेलार यांनी आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात दहीहंडीचे आयोजन करून थेट आवाहनच दिले आहे.

कोरोना काळाला तत्कालीन सरकारच्या आडमुठेपणामुळे अनेक सणांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता राज्यात शिवसेना आणि भाजपा युतीचे सरकार स्थापन झाल्यापासून सर्वच सण थाटामाटात साजरा केला जात आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी सणाला साहसी खेळाचा दर्जा देऊन सर्व गोविंदा पथकाचा सन्मान केला होता. अशातच आता थेट आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ असलेल्या वरळीमध्ये शिवसेना सचिव आणि शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांच्या संकल्पनेतून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज एकीकडे सत्ताधारी पक्ष असलेला शिवसेनेचा शिंदे गट आणि विरोधात बसलेले उद्धव ठाकरे गटामध्ये शाब्दिक चकमक रंगत असताना थेट शिवसेना सचिव सुशांत शेलार यांनी आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात दहीहंडीचे आयोजन करून थेट आवाहनच दिले आहे. ऐन निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना वरळी मतदार संघात दहीहंडीचे आयोजन करून सर्व मुंबईचे नाही तर महाराष्ट्राचे लक्ष या दहीहंडी उत्सवाकडे लागले आहे.

विशेष म्हणजे या दहिहंडीमध्ये मागच्या एक वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाचा उल्लेख असलेली दहीहंडी लावण्यात येणार आहे. तसेच स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. मागच्या वर्षभरात आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात अनेक उपक्रम तसेच विविध विकासकामांचे आयोजन राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे तसेच स्थानिक जनतेचा विश्वास देखील या सरकारवर अधिक दृढ होताना दिसून येत आहे. या दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राहुल शेवाळे, दीपक केसरकर, उदय सामंत, तसेच सिनेकलाकार, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक सुद्धा उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

स्थळ
करी रोड नाका, लोअर परेल (पूर्व )
सायं ६.०० वाजता

हे ही वाचा:

Asia Cup 2023, भारतीय टीमला मोठा झटका, केएल राहुल संघाबाहेर ‘या’ खेळाडूला मिळणार संधी…

बच्चू कडू यांनी केली Sachin Tendulkar कडे मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss