Monday, November 20, 2023

Latest Posts

कुर्ल्यातील धक्कादायक बाब उघडकीस!, मेट्रो साईटवर सुटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह

सध्या मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक गुन्हे हे घडत आहेत. मुंबईतून एक धक्कादायक (Mumbai Crime News) बातमी समोर आली आहे.

सध्या मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक गुन्हे हे घडत आहेत. मुंबईतून एक धक्कादायक (Mumbai Crime News) बातमी समोर आली आहे. कुर्ला (Kurla) परिसरात रविवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. तपासासाठी गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि पोलीस पथकाने सुटकेस उघडली असता एका महिलेचा मृतदेह आढळून (Dead Body Found in Suitcase) आला.

महिलेचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेने टीशर्ट आणि नाईट पॅन्ट घातली होता. महिलेचा मृतदेह ज्या सुटकेस बॅगेत आढळला ती सुटकेस दुमडलेली होती कुर्ला पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही. या महिलेची ओळख पटवून देण्याचे प्राथमिक आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मुंबई पोलिसांनी मुंबई शहरात किंवा आजूबाजूच्या परिसरात कोणत्या महिलेची बेपत्ता असल्याची तक्रार आहे का हे ही तपासात आहेत. त्याचबरोबर त्या परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासात आहे. महिलेचा फोटोमार्फत ओळख पटवायचे काम सुरू आहेत.

 

पोलिस सूत्रांनी दिलेलया माहितीनुसार, रविवारी (१९ नोव्हेंबर) कुर्ला पोलीस ठाण्यात दुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान एक संशयीत बॅग आढळून आल्याचा फोन आला. सी.एस टी.रोड शांतीनगरच्या समोरील बाजूला मेट्रो रेल्वेच्या कामाच्या जागेवरील बॅरेकेटचे आतील बाजूस एक संशयित सुटकेस होती. पोलिसांनी त्या जागेवर जाऊन सुटकेसची तपासणी केली असता त्या सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह मिळून आला. सुटकेसमध्ये मृतदेह असल्याने या प्रकरणात खुनाची बाब स्पष्टपणे दिसून येत आहे. पोलिसांनी राजावाडी रूग्णालयात मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

 

हे ही वाचा : 

क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर बोलताना संजय राऊतांची टोलेबाजी

WORLDCUP 2023: टीमला ORIGINAL ट्रॉफी मिळते का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss