ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरार पूर्व येथील विवांत हॉटेलमध्ये राडा झाला आहे. विरारमध्ये विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि विनोद तावडे यांच्यात यावेळी बाचाबाची झाली. हितेंद्र ठाकूर यांच्याकडून तावडेंवर आरोप करण्यात आला आहे. यामुळेच, विरारच्या हॉटेलमध्ये वातावरण तापलं आहे. दरम्यान, विनोद तावडे यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरार येथील एका हॉटेलमध्ये पैसे वाट्ल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला आहे. विनोद तावडे हे विरार येथील विवांत हॉटेलमध्ये ५ कोटी रुपये घेऊन आले होते. ही गोष्ट बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना समजली त्यावेळी त्यांनी हॉटेलवर धाव घेतली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. बहुजन विकास आघाडीने केलेल्या आरोपानुसार विनोद तावडे हे मंगळवार दि. १९ नोव्हेंबरला विरार पूर्व येथे असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. तेव्हा भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात बैठक सुरु होती. त्यावेळी बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले होते. याठिकाणी पैसे वाटप सुरु असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. या राड्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रित केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी सुरु असल्याचे पाहायला मिळाले.
विनोद तावडे ५ कोटी घेऊन येतायेत हे मला भाजपवाल्यांनी सांगितलं असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना केला.
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…