spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

Saif Ali Khan चाकू हल्ला प्रकरणी सुप्रिया सुळेंनी केली चिंता व्यक्त

सैफवर हल्ला झाल्यानंतर आता सर्वच क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या संतापजनक चिंता व्यक्त केली आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना काल रात्री २ च्या सुमारास घडली. सैफ अली खानवर हल्ला करणारा व्यक्ती त्याच्याच घरात रात्रभर दबदबा धरून बसला होता, त्यानंतर त्याचा तेथील एका महिला कर्मचारीसोबत वाद झाला. हा आवाज ऐकून सैफ अली खान रूममधून बाहेर आला, तेव्हा त्या व्यक्तीने सैफवर हल्ला केला. सैफवर हल्ला झाल्यानंतर आता सर्वच क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या संतापजनक चिंता व्यक्त केली आहे.

मीडियाच्या माध्यमातून ही बातमी कळली. महाराष्ट्रात आणि भारतात क्राईम वाढत आहे. मुंबईच्या कमिशनरशी बोलणे झाले आहे. खान कुटुंब घाबरणे साहजिकच आहे. मुंबईमध्ये खूप मोकळ जगायची सर्वांनाच सवय आहे. सर्वांकडेच खूप मोठी सिक्युरिटी यंत्रणा नसते. पोलिसांकडून याबाबतची माहिती लवकरच समजेल. हा माणूस कुठून आला याबाबत क्लॅरिटी येत नाही. बीड असेल परभणी असेल किंवा आता बांद्रामध्ये झालेली घटना असेल यातून गुन्हेगारी वाढलेली वाढलेली दिसत आहे. कुटुंबाच्या सुरक्षतेबाबत सरकारने गांभीर्याने घ्यावं. बीड आणि परभणीला जशी सिक्युरिटी दिली आहे तशी या कुटुंबाला देखील तातडीने दिली पाहिजे. सैफ अली खानवर झालेला हल्ला हा राजकीय विषय नाही, सध्या घडत असलेल्या बाबी चिंताजनक आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.

सैफ अली खानवर रात्री दोनच्या सुमारास हल्ला झाला आहे. सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने त्याच्या घरातील महिला कर्मचारीसोबत झटापटी केली. आवाज ऐकून सैफ अली खान त्याच्या रूमच्या बाहेर आला आणि हा सर्व प्रकार घडला. या घटनेत सैफ अली खानवर चाकूने ६ वार करण्यात आले. त्याच्या पाठीच्या मणक्यात चाकूचा एक छोटा तुकडा घुसला असून त्यावर शस्त्रक्रिया झाली. आता सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा : 

Saif Ali Khan Attacked : अभिनेता सैफ अली खानवर अज्ञाताकडून घरात घुसून चाकू हल्ला; लिलावती रुग्णालयात उपचार सुरू

सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss