spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची सेना लवकरच सोडचिट्ठी देणार…

महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपयश आलं. त्यानंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी त्यांना पुन्हा एकदा धक्का बसणार आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडत आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या पुण्यातील पाच नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपयश आलं. त्यानंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी त्यांना पुन्हा एकदा धक्का बसणार आहे.

महापालिकेमध्ये १० नगरसेवक हे ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच येरवड्यातील अविनाश साळवे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून तिकीट मिळवण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर शिवसेना फुटीनंतर नाना भानगिरे यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली. त्यामुळे या पक्षाचे ८ नगरसेवकच उरले आहेत. त्यातील ५ नगरसेवक देखील आता ठाकरेंना सोडचिट्ठी देणार असल्याने पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. विशाल धनवडे, बाळा ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे आणि प्राची आल्हाट भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ५ माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असून, त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. ५ जानेवारीला मुंबईत पक्षप्रवेश होणार असल्याच्या चर्चा आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी महायुतीला मोठ्या प्रमाणावर साथ दिली, तर महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. अशातच आता मागील दोन ते तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लवकरच होण्याचे संकेत मिळत आहेत.

हे ही वाचा:

मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर करणार का ?

भारतीय क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का ! सिडनी कसोटीपूर्वी गोलंदाज जखमी तर संघात कोणाला मिळणार जागा ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss