Saturday, December 2, 2023

Latest Posts

“ते झेरॉक्स सेंटर विद्यापीठाचंच”, युवा सेनेच्या आरोपांवर विद्यापीठ प्रशासनाचे स्पष्टीकरण

"ते झेरॉक्स सेंटर विद्यापीठाचंच", युवा सेनेच्या आरोपांवर विद्यापीठ प्रशासनाचे स्पष्टीकरण

मुंबई विद्यापीठाच्या दुरस्त व अध्ययन शिक्षण संस्था (IDOL) च्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांचे झेरॉक्स करण्यासाठी चक्क सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर (XEROX CENTRE) आले असल्याच्या आरोपावर मुंबई विद्यापीठाने खुलासा केला आहे. ते झेरॉक्स सेंटर हे विद्यापीठाच्या आवारातील आहे आणि विद्यापीठाच्या मालकीचे असून नियमित झेरॉक्स व इतर कामासाठी त्या ठिकाणी झेरॉक्स काढले जात असल्याचं विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.

केलेल्या आरोपांवर काय म्हणाले विद्यापीठ?

आयडॉलचा (IDOL) परीक्षा विभाग पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा घेत असतो व त्यानंतर त्याचे निकाल जाहीर करत असतो. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ अन्वये निकाल जाहीर केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेच्या छायांकित प्रतीची मागणी केलेली असते. त्यांना उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत देणे हे विद्यापीठासाठी बंधनकारक आहे. यासाठी मुंबई विद्यापीठातील आयडॉलच्या इमारतीमध्ये तळमजल्यावर स्वतंत्र झेरॉक्स केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे २४ तास मुंबई विद्यापीठाचे सुरक्षारक्षक तैनात असतात व ही जागा सीसीटी कॅमेऱ्याच्या नियंत्रणात आहे. सदरचे झेरॉक्स केंद्र हे आयडॉलच्या (IDOL) इमारतीत असून ते सार्वजनिक झेरॉक्स कामांसाठी नाही. आयडॉलच्या स्टाफला व तेथील विद्यार्थ्यांना झेरॉक्स काढण्यासाठी हे झेरॉक्स केंद्र सुरू करण्यात आलेले आहे.

काय आहे युवासेनेचा आरोप-

विद्यापीठाच्या परीक्षा विभागात असलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर सापडल्या असल्याचा आरोप युवा सेनेने केला होता. या सगळ्या प्रकरणाचा तपास करून परीक्षा विभाग प्रमुखांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील केली होती. यापूर्वीही मुंबई विद्यापीठातील उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचा प्रकरण समोर आला होता. आता त्यानंतर या उत्तरपत्रिका बाहेरच्या झेरॉक्स सेंटरवर सापडल्याचा आरोप युवासेनेकडून केला जात आहे.

दुरस्थ व अध्ययन शिक्षण संस्था (IDOL) च्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका झेरॉक्स करण्यासाठी चक्क सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर सापडल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यापीठाचा परीक्षा विभाग अत्यंत गोपनीय समजला जातो, मात्र याच विभागातील उत्तर पत्रिका बाहेर कशा काय येतात? असा सवाल युवा सेनेने उपस्थित केला आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि प्र. कुलगुरू यांनी लक्ष देऊन हे सगळे गैरप्रकार थांबवत आयडॉलच्या (IDOL) परीक्षा विभागप्रमुख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी युवा सेनेने केली आहे, त्यावर आता विद्यापीठाने स्पष्टीकरण दिलं आहे.

हे ही वाचा : 

टीआरपीच्या शर्यतीत सिध्दार्थ जाधवचा ‘आता होऊदे धिंगाणा’ ठरला महाराष्ट्राचा नंबर १ शो

अजित पवारांच्या मातोश्रींच्या इच्छेवर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss