मुंबईत ९० च्या दशकात डबल डेकर बस (Double decker bus) आल्या होत्या. लहानपणी आपण या बस मधून प्रवास देखील केला असेल. पण आता हीच डबल डेकर बस कायमची बंद होणार आहे. आधी या बसची संख्या ९०० च्या आसपास होती पण आता ती बस कायमची बंद होणार आहे. या बस बंद होण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांचा वाढता खर्च. ही बस आता पुढ्याच्या काही तासांमध्ये दिसेनाशी होणार आहे. ८६ वर्ष ही बस कार्यरत होती.
डबल डेकर बस बंद करण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. १५ सप्टेंबरपासून डिझेलवर चालणारी डबल डेकर बस कायमची बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उद्यापासून ही बस मुंबईच्या रस्त्यावर दिसणार नाही. मुंबई बेस्टच्या ताफ्यात फाजल ७ डबल डेकर बस आहेत. त्यातील तीन बस या ओपन डेक आहेत. उद्या १५ सप्टेंबरपासून डबल डेकर बस आणि ५ ऑक्टोबरपासून ओपन डेक बस बंद केल्या जाणार आहेत. त्यामुळे या बस बंद होताच डबल डेकर बस इतिहास जमा होणार आहेत. या बस बंद करण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याचा वाढत खर्च आणि या बस डिझेलवर चालतात. या बसचा कार्यकाळ हा फक्त १५ वर्षाचा आहे. त्यामुळे आता या बस ताफ्यातून हटवण्यात येणार आहेत. ८६ वर्षपासून या बस मुंबईमध्ये धावत होत्या. १९३७ मध्ये इंग्रजांनी या डबल डेकर बस मुंबईतील रस्त्यावरून चालवल्या होत्या. त्यानंतर या बसेस वाहतुकीचं एक महत्त्वाचं साधन बनल्या.
डिझेलवर चालणाऱ्या डबल डेकर बसेसच्या जागी इलेक्ट्रिकवर डबल डेकर बसेस चालवल्या जाणार आहेत. या नवीन डबल डेकर बसचा रंग रेड अँड व्हाईट असेल. जुन्या डबल डेकर बसचा रंग फक्त लाल होता. तसेच पर्यटकांसाठी लवकरच ओपन डेक बसेसही खरेदी केल्या जाणार आहेत. या ओपन डेक बसही इलेक्ट्रिक असतील.फेब्रुवारीतच बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस आल्या आहेत. एकूण २५ बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत . त्याची किंमत दोन कोटीहून अधिक आहे. तर डिझेलवर चालणाऱ्या एका डबल डेकर बसवर किंमत ३० ते ३५ लाख रुपये खर्च होतात.
हे ही वाचा:
ऑनलाईन गेमिंग अँपवर ईडीचे छापे
या गावात राजकीय नेत्यांना येण्यास बंदी घातली आहे, कोणतं आहे ‘ते’ गाव घ्या जाणून…