spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

कुलीकडून महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी अवघ्या दीड तासात पकडले आरोपीला

रविवारी एका महिलेवर वांद्रे टर्मिनसमध्ये ट्रेनच्या रिकाम्या डब्यात बलात्कार करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून पोलिसांनी अवघ्या काही वेळातच आरोपीला पकडले आहे. या घटनेमुळे मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

रविवारी एका महिलेवर वांद्रे टर्मिनसमध्ये ट्रेनच्या रिकाम्या डब्यात बलात्कार करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून पोलिसांनी अवघ्या काही वेळातच आरोपीला पकडले आहे. या घटनेमुळे मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मुंबईतील Bandra परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे.रविवारी २ फेब्रुवारीला एक महिला तिच्या मुलासोबत प्रवास करत होती. शनिवारी रात्री त्या महिलेची ट्रेन वांद्रे टर्मिन्समध्ये पोहोचली. Bandra terminans येथून तिची दुसऱ्या ठिकाणी जाणारी ट्रेन होती. परंतु तिची ट्रेन दुसऱ्या Platform वर उभी होती. नंतर ती महिला त्या ट्रेनमध्ये चढली. त्यावेळी इतर कोणताही प्रवासी त्या ट्रेनमध्ये नव्हता. त्याचवेळी एक कुली त्या ट्रेनमध्ये चढला. ट्रेन मध्ये कोणी नाही हे पाहून कुलीने गैरफायदा घेत त्या महिलेवर Rape केला. व तिथून पळून गेला.

त्या महिलेने तात्काळ धीर दाखवत वांद्रे GRPF पोलिसात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस देखील तत्परतेने कामाला लागले. परंतु, पहिल्यांदा महिलेला वैद्यकीय मदत (Medical Help) देण्यात आली. यानंतर तात्काळ आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले. यादरम्यान रेल्वे पोलिसांनी (Railway Police) आरोपीला शोधण्यासाठी अनेक CCTV फुटेज तपासले आणि आरोपीला अटक करण्यात आली. प्राथमिक माहितीच्या आधारे आरोपीला दीड तासात अटक करण्यात आली. सदर आरोपीचे नाव राहुल अब्दुल शेख आहे. तो विनापरवाना हमाल असल्याची प्राथमिक माहिती आहे. यासंदर्भात, पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरु आहे. आरोपीची गुन्हेगारी पार्शवभूमी आहे का याचीही पडताळणी केली जात आहे.या संपूर्ण घटनेमुळे मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर रेल्वे पोलिस आणि प्रशासनावर देखील टीका होत आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सुरक्षारक्षक असतात. मात्र ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा तिथे सुरक्षारक्षक नव्हते का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे कदाचित वांद्र्यातील रेल्वेच्या पोलीस सुरक्षा रक्षकांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा : 

पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांकडून महिला व लहान मुलीला मारहाण

Amol Khatal यांचा Raj Thackeray यांच्यावर पलटवार; Balasaheb Thorat का पराभूत झाले हे पाहण्यासाठी मुंबई बाहेर या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss