Friday, December 1, 2023

Latest Posts

मुंबईतल्या घरांचा मागील ११ वर्षाचा रेकॉर्ड तुटला,कोट्यावधी रुपयांच्या घरांची झाली विक्री

मुंबईतल्या घरांचा मागील ११ वर्षाचा रेकॉर्ड तुटला,कोट्यावधी रुपयांच्या घरांची झाली विक्री

रिअल इस्टेट नुसार भारतात सर्वाधिक महागडं शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. येथे जर सर्वात महाग जर काय असेल तर ते आहे ‘घर’, मुंबईत स्वतःच घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. या मुंबईत एकाच्या जीवावर घर घेणं अतिशय अवघड आहे. २०२० च्या कोरोना काळानंतर देशभरात घरांच्या किंमतीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळालेली आहे. पण देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर याचा काही परिणाम होताना दिसत नाहीये, गेल्या महिन्यात मुंबईत एकूण १० हजार घरांची नोंदणी आलेली आहे. हा रेकॉर्ड गेल्या ११ वर्षांमधील सर्वाधिक आहे कारण यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड इतिहास जमा झालेले आहेत. यामध्ये रुपये एक कोटी अथवा त्यापेक्षा अधिक किंमतींच्या घरांची पण मोठी विक्री झाली आहे.

सरकारची कमाई पण आणि विक्रम पण

महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या आकड्यांमुळे ही बाब समोर आली आहे. त्यानुसार, ऑक्टोबर महिन्यात मुंबईत एकूण १०,६०१ मालमत्तांची नोंद झालेली आहे. या मालमत्तांच्या नोंदणीमुळे सरकारच्या तिजोरीत ८३५.३२ कोटी रुपयांचा महसूल जमा झालेला आहे. गेल्या ११ वर्षांतील हे उत्पन्न विक्रमी असल्याचा दावा मुद्रांक विभागाने केला आहे. ज्या मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे त्यातील जवळपास ८० टक्के मालमत्ता ही रहिवाशी वापरासाठी तर २० टक्के मालमत्ता या व्यावसायिक वापरासाठी नोंदणी करण्यात आल्या आहेत.

सणासुदीच्या दिवसात संख्या वाढली

गेल्या ऑकटोबर महिन्यात नवरात्रोत्सव आणि दसरा हा सण झाला. त्यापूर्वी गणेशोत्सव होऊन गेला. या काळात अनेकांनी घर बुकिंग करण्यास पसंती दिली, त्यामुळे एकाच महिन्यात घरांची विक्रमी बुकिंग नोंदवण्यात आली. केवळ भारतीय नागरिकांनीच नाही तर एनआरआय (NRI), अनिवासी भारतीय नागरिकांनी पण अनेक मालमत्ता यादरम्यान खरेदी केल्या. येणाऱ्या दिवाळीच्या काळात आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महागड्या घरांची विक्री सर्वाधिक

यावर्षी मुंबईत जानेवारी महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत एक करोड व त्यापेक्षा अधिक किंमतीची अधिक घरांची विक्री झाली आहे, प्रापर्टी कन्सल्टिंग फर्म नाईट फ्रँकने हा अंदाज वर्तवला आहे. या जवळपास १० महिन्यात १,०४,८३२ मालमत्तांची नोंदणी करण्यात आली. त्यातील ५८,७०६ मालमत्तांची किंमत एकूण एक कोटी रुपयांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. ४६,१२६ इतक्या मालमत्तांची किंमत ही एक कोटी रुपयांहून कमी आहे.

हे ही वाचा : 

सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत आरक्षणापेक्षा हिंसाचाराची चिंता, जरांगेंना संयमाचा सल्ला

Netflixची सुरुवात कशी झाली? | How Netflix has started?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss