६५ बेकायदा इमारती बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयाने जेव्हा इमारती बेकायदा असल्याचे सांगत कारवाईचे पहिला आदेश दिले. त्या आदेशानंतरही देखील साई गॅलेक्सी या इमारती फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झाले. इतकेच नाही तर गेल्या दोन महिन्यापासून कल्याण डोंबिवलीत ३ ही रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे रजिस्ट्रेशनचा भ्रष्टाचार आणि सर्व सामान्यांची फसवणूक सुरुच आहे. ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर शिवसेना ठाकरे गटाने डीसीपींची भेट घेत त्वरीत आरोपींना अटक करुन सर्व सामान्यांची फसवणूक थांबविण्याची मागणी केली आहे.
६५ बेकायदा बांधकाम प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्यासह कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे, डोंबिवली शहर प्रमुख अभिजीत सावंत यांनी आज कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना एक निवेदन सादर करण्यात आले. यासंदर्भात जिल्हा प्रमुख म्हात्रे यांनी सांगितले की, ६५ बेकायदा इमारत प्रकरणातील मागचा जे आका आहे. त्यांच्या शोधण्याकरीता डीपीसींना निवेदन दिले आहे. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर ही बेकायदा इमारतीमधील घरांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत. त्याचे पुरावे डीसीपींना दिले आहे. या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील त्यांची चाैकशी करुन त्यांच्य विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे. त्यांना तुरुंगात टाकावे.
६५ बेकायदा इमारत प्रकरणात हजारो नागरीकांची फसवणूक झाल्यावरही आज देखील फसवणूक सुरु आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात काही बेकायदा बांधकामातील घरांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. डीपीसींनी त्याचे पुरावे दिले आहे. गॅंग ऑफ डोंबिवली या मागे आहे. पेपर तयार करणारे मोठे स्कॅमर आहे. त्याचा तपास डीसीपींनी करावा या प्रकरणी पोलिस आयुक्तांचीही भेट घेणार आहे. ज्या लोकांच्या विरोधात या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. तेच लोक या रजिस्ट्रेशन घोटाळ्यात आहेत. आजही रजि्सट्रेशन कार्यालयात अधिकृत इमारतीचे पेपर लावून अनधिकृत इमारतीमधील घरांचे रजिस्ट्रेशन सुरु आहे. रजिस्टेशन करण्यासाठी तीन लाख रुपये घेतले जात आहेत. त्याच्या मागे कोण आहे. त्याचा तपास डीपीसींनी करावा. त्यासाठी एसआयटी नेमावी. या संदर्भात जे पुरावे सादर केले. त्यात स्पष्ट दिसते आहे की, न्यायालयाच्या आदेशानंतर साई गॅलेक्सी इमारतीमधील एका फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झाले आहे.
गणेशोत्सवासाठी POP आणि उंच मूर्तींना बंदी; मुंबई महानगरपालिकाकडून परिपत्रक जारी
Follow Us