spot_img
spot_img

Latest Posts

दहावी बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर

राज्यातील दहावी आणि बारावीचा विद्यार्थ्यांची धाकधूक संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक ( Maharashtra State Secondary board ) व उच्च माध्यमिक शिक्षण(Higher Secondary Education) मंडळाचा वतीने घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षा २०२३ चा निकाल उद्या २८ ऑगस्ट रोजी दुपारी जाहीर होणार आहे.

राज्यातील दहावी आणि बारावीचा विद्यार्थ्यांची धाकधूक संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक ( Maharashtra State Secondary board ) व उच्च माध्यमिक शिक्षण(Higher Secondary Education) मंडळाचा वतीने घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षा २०२३ चा निकाल उद्या २८ ऑगस्ट रोजी दुपारी जाहीर होणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे.

दहावी आणि बारावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. हा रिझल्ट राज्य मंडळाचा www.mahresult.nic.in या वेबसाइट वर पाहता येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे विषयानुसार गुण दिसणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक( Maharashtra State Secondary board ) दहावीची पुरवणी परीक्षा १० जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली होती. तर उच्च माध्यमिक शिक्षण (Higher Secondary Education) बारावीची परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट रोजी घेण्यात आली होती. यांचं परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. या कालावधीत राज्याचा ९ विभागीय मंडळातून परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन ,गुणपडताळणी या सर्व सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. छायाप्रतीसाठी आणि गुणपडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर पर्यंत करता येणार आहे.

उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन विध्यार्थ्यांना करता येणार आहे. जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून त्याची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यानंतर पाच दिवसाचा आत त्याचे पुनर्मूल्यांकन करून दिलेले शुल्क भरून विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

हे ही वाचा:

Amit Thackeray यांनी दिला सरकारला इशारा, शेवटचं सांगतोय….

Devendra Fadnavis यांनी परभणीतून केला विरोधकांवर हल्लाबोल, सकाळी ९ वाजता एक भोंगा सुरू होतो आणि

MNS च्या जागर यात्रेत कोकणकन्या Ankita Walawalkar ने लावली हजेरी
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss