Thursday, November 30, 2023

Latest Posts

रविवारी घराबाहेर पडायचा विचार करतायत? तर Megablock संदर्भात नक्की जाणून घ्या

मुंबई लोकल म्हणजेच मुंबईकरांची जीवन वाहिनी आहे. जर लोकलच्या वेळापत्रकात अचानक जरा जरी बदल झाला तर लाखो मुंबईकरांची दिनचर्या खोळंबतेच.

Mumbai Local Megablock News: मुंबई लोकल म्हणजेच मुंबईकरांची जीवन वाहिनी आहे. जर लोकलच्या वेळापत्रकात अचानक जरा जरी बदल झाला तर लाखो मुंबईकरांची दिनचर्या खोळंबतेच. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. जर तुम्हाला उद्या दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ (रविवार) रोजी लोकल ट्रेनने प्रवास करायचा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. जर उद्या तुम्हाला कुठे फिरायला जायचे असेल तर त्याच नियोजन हे आजच करा.

रविवारी (२९ ऑक्टोबर २०२३) मुंबई लोकलच्या दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक (Megablock) घेतला जाणार आहे. पश्चिम रेल्वेनं (Western Railway) वसई रोड ते विरार (Vasai Road to Virar) स्थानकादरम्यान शनिवारी मध्यरात्री ब्लॉक जाहीर केला आहे. तर, रविवारी ट्रान्स हार्बर (Trans Harbour) मार्गांवरही मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. अशातच एक दिलासादायक बाब म्हणजे, मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गांवर येत्या रविवारी कोणताही ब्लॉक घेतला जाणार नाही. रेल्वे रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेसह इतर काम करण्यासाठी मध्य रेल्वेमधील ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे – वाशी / नेरूळदरम्यान मध्यरेल्वेनं रविवारी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. पश्चिम रेल्वेनं वसई रोड – विरारदरम्यान शनिवारी मध्यरात्री ब्लॉक जाहीर केला आहे. तर, मध्यरेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल.

ट्रान्सहार्बर मार्ग
कुठे : ठाणे – वाशी/नेरूळ अप आणि डाऊन
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०
परिणाम : ब्लॉक वेळेत ठाणे – वाशी / नेरूळदरम्यान लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेमार्ग
कुठे : वसई रोड – विरार अप आणि डाऊन धीमा मार्ग
कधी : शनिवारी रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी ते रविवारी पहाटे ४ पर्यंत
परिणाम : ब्लॉक काळात धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येतील.

रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी आज जम्बो मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा : 

‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद

संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss