केवळ फुकटची प्रसिद्धीसाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना गटाचे नेतेचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) मुस्लिमांविरुद्ध वादग्रस्त विधाने करत आहेत. जर त्यांना मोठा नेता बनायचे असेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी कठोर मेहनत करावी लागेल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) प्यारे जिया खान यांनी दिली आहे. शिवसेना नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी नुकतेच मुंबईतील हाउजिंग जिहादचा मुद्दा उपस्थित करत मुस्लिम बांधकाम व्यावसायिकांवर गंभीर आरोप केले होते.
संजय निरुपम यांनी म्हटले होते की, बिल्डर मुंबईची लोकसंख्याशास्त्रीय रचना बदलत आहेत आणि मुस्लिम बिल्डर स्लम पुनर्वसन प्राधिकरणात (SRA) मोठा घोटाळा करत आहेत. संजय निरुपम यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना प्यारे जिया खान म्हणाले, “संजय निरुपम यांनी जे काही म्हटले आहे, ते त्यांच्या मनाची उपज आहे. महाराष्ट्र सरकार राज्यात असे काहीही चुकीचे होऊ देणार नाही. किमान त्यांना आपल्या नेत्यांवर एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. ते स्वतः नगरविकास मंत्री आहेत, त्यांच्या उपस्थितीत असे काही होऊ शकते का?” आजकाल एक ट्रेंड किंवा स्पर्धा सुरू झाली आहे की, आपली राजकीय दुकानदारी चालवायची असेल तर मुस्लिमांविरुद्ध विधान द्या.
पण मोठा नेता होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासारखी मेहनत करावी लागते. शॉर्टकट मारून कोणीही मोठा नेता बनू शकत नाही. संजय निरुपम यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा एकच मंत्र आहे ‘सबका साथ, सबका विकास’.
Narendra Modi : RSS मुळे माझा मराठीशी संबंध म्हणत, नरेंद्र मोदींनी केला मराठी भाषेचं कौतुक
Follow Us