spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

टोरेस कंपनीने ५ वर्षात दुप्पट तर १० वर्षात चौपट असा गेम करत गुंतवणूकदारांना गंडवले

झटपट पैसे कमवण्याच्या नादात अनेक जण हातात आहेत ते पैसे ही गमावून बसतात. असे प्रकार अनेक ठिकाणी घडल्याचे समोर आले आहे. कोणी दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखतो तर कुणी तिप्पट पैशांची हमी देतो. पण नवी मुंबईत घडलेल्या घोटाळ्यात दुप्पट, तिप्पट बरोबर दहा वर्षात चौपट पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टोरेस्ट गुंतवणूक कंपनी असं या कंपनीचं नाव असून नवी मुंबईसह दादर, सानपाडा, मीरा रोड, कांदिवली, कल्याण, ग्रँड रोड, भाईंदर परिसरात अशा ठिकाणी तिच्या शाखा होत्या. या कंपनीने जबरदस्त मार्केटिंग टीम नेमून लोकांना त्यांच्या पैशावर ३ ते ११% परतावा मिळेल असं आमिष दिलं आणि लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडलं. लोकांनी त्याच लालसेपोटी १०,००० पासून ते १० लाखांपर्यंत टोरेस्टमध्ये गुंतवणूक केली.

भाईंदर पूर्वच्या रामदेव पार्क परिसरात असणाऱ्या आर्टिफिशियल डायमंड विक्री करणाऱ्या टोरेस्ट नामक कंपनीच्या मार्फत लोकांना पैसे गुंतवणूक करण्यास सांगण्यात आलं होतं. लोकांनी पैसे ही गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. वर्षभरात गुंतवणूकदारांना प्रत्येक आठवड्याला काही टक्केवारी प्रमाणे रक्कम खात्यात जमा होईल असंही सांगण्यात आलं होतं. सुरुवातीला काही जणांचे पैसे जमाही झाले. माऊथ पब्लिसिटीमुळे अनेकांनी आपले मित्र नातेवाईकांना कंपनीत गुंतवणूक करायला सांगितलं. पण २ दिवसापूर्वी मात्र सकाळी अचानक त्या शोरूमचं दादर येथील मुख्य कार्यालय बंद झालं. त्याच पाठोपाठ मीरा भाईंदर मधील देखील शोरूम बंद करण्यात आलं. शोरूम बंद झाल्याची माहिती मिळताच पैसे गुंतवणूक केलेल्या लोकांची गर्दी जमा झाली. सगळ्यांनी कंपनीच्या मालकाला आणि एजंटला फोन केले पण सगळ्यांचे फोन बंद होते. दरम्यान आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर दुकानाबाहेरच लोकांनी ठिया धरला. ही कंपनी एकच माणूस चालवत होता आणि त्याने मुंबई आणि उपनगरातील तीन लाख लोकांना ५०० कोटी रुपयांचा चुना लावला असं बोललं जातंय. या व्यक्तीने लोकांना पाच वर्षात दुप्पट, सात वर्षात तिप्पट आणि १० वर्षांमध्ये चौपट रक्कम देण्याचे आमिष दाखवलं होतं. याबद्दल कंपनीत गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार मेहुल चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार सोने चांदी आणि आर्टिफिशियल डायमंड्सची विक्री करणाऱ्या टोरेस्ट कंपनीने गतवर्षी ३ फेब्रुवारी रोजी मुंबई कार्यालय सुरू केलं. दागिन्याची विक्री केल्यास गुंतवलेल्या रकमेवर आठवड्याला ४% परतावा देण्याचा आमिष दाखवून मुंबईत अनेक गुंतवणूकदार जोडण्यात आले. शहरात कंपनीच्या सहा शाखा असून कांदिवलीची शाखा काही दिवसांपूर्वी सुरू झाली होती. चार हजार रुपयांपासून गुंतवणूक करण्याची सोय व दर आठवल्याला परतावा मिळत असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कंपनीत पैसे गुंतवले. सुरुवातीला अनेकांना परतावा देण्यात आला. नंतर कंपनीने व्याजदर वाढवून ६% केल्यामुळे ग्राहकांनी गुंतवणुकीची रक्कमही वाढवली. त्यानंतर कंपनीने थेट ११% परताव्याचा आमिश दाखवल्यामुळे गुंतवणूकदारांची झुंबड उडाली होती.

टोरेस्ट कंपनीत गुंतवणूकदारांना अवघ्या चार हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती. ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवार दरम्यान त्याचा परतावा देत असे. सहा लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवर ही कंपनी ६% व्याज देत होती, तर सहा लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना ११% व्याज मिळत होते. सुरुवातीच्या काळात टोरेस्ट कंपनीने उच्च इमारतींमधील गुंतवणूकदारांना घरे, गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा दिला, येऊन त्यांची मन जिंकली. लोक देखील या आमिशाला भुलले. हळूहळू गुंतवणूकदारांची संख्या वाढत गेली, लोक डोळे झाकून लाखो रुपये टोरेस्ट कंपनीत गुंतवत गेले. काही दिवसांमध्ये व्याजासह संपूर्ण रक्कम आपल्याला परत मिळेल असा विश्वास बाळगून गुंतवणूकदार निश्चिंत होते. मात्र आता कंपनीने अचानक आपला गाशा गुंडाळला आहे. यामुळे अनेक गुंतवणूकदारांना मोठा झटका बसलाय अनेकांनी आर्थिक लोभापायी आपल्या जवळचे होते नव्हते ते सगळे पैसे टोरेस्ट कंपनीत गुंतवून टाकले आहेत. मात्र आता सगळ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. ८ जानेवारी पर्यंत तुमचे पैसे परत मिळतील असं गुंतवणूकदारांना सांगण्यात आलं आहे. मात्र आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर लोकांनी कंपनीच्या ऑफिस बाहेर प्रचंड संतापून गर्दी केली.

दरम्यान पोलिसांच्या पथकांसह दंगल नियंत्रण पथक दादरमधील कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आले आहे. सहा पैकी तीन शाखांची गुंतवणूकदारांनी मोडतोडही केली. सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीतील बहुतांश कर्मचारी कंपनीतच थांबले होते. ठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. फसवणुकीच्या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. आणि नवीन माहितीनुसार कंपनीत ५०० कोटींचा नाही तर सुमारे ३००० कोटींचा घोटाळा झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ता फसवणुकीचे बिंग फुटताच पाळण्याच्या तयारीत असलेल्या संचालकांसह, जनरल मॅनेजर आणि स्टोअर मॅनेजरला शिवाजी पार्क येथे पोलिसांनी मंगळवारी म्हणजेच ७ जानेवारीला अटक केली. तर कंपनीचा संस्थापक मात्र युक्रेनला पसार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

हे ही वाचा:

रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने शिवानी-अंबरचं केलं केळवण; कलाकारांनी शेयर केले फोटो

बेघर नागरिकांनी टिपलेल्या फोटोच्या ‘माय मुंबई 2025’ दिनदर्शिकेचे प्रकाशन CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते पार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss