गेल्या काही वर्षात समुद्रकिनाऱ्यावर प्रदूषण वाढले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे किनारा परिसरात आढळणाऱ्या विविध माशांच्या जातींचा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्रातील सातही जिल्ह्यात नद्या नाले-खाड्या येथून प्रदूषित पाणी, प्लास्टिक कचरा आणि घनकचरा समुद्रात आल्यामुळे संपूर्ण किनारपट्टीसह समुद्रात सहामैल पर्यंतचा समुद्र प्रदूषित झाला आहे. त्याचबरोबर या वाढत्या प्रदूषणामुळे मत्स्य दुष्काळ देखील वाढत आहे.
https://youtu.be/T1fIrxhn9Dc?si=3XB2L7Sqm3I1kS3M
समुद्र प्रदूषणामुळे मत्स्य प्रजननावर गंभीर परिणाम होत आहेत. प्रदूषणामुळे समुद्रातील जीवन आणि पर्यावरणावर अनेक नकारात्मक परिणाम होतात, ज्यामुळे मत्स्यांची प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. समुद्रातील मवाळ शेवाळ, वनस्पती, जैववैविधता सूक्ष्म जंतू नष्ट होत असल्यामुळे सागरी वातावरणात बदल घडत आहेत.
समुद्रातील रासायनिक प्रदूषण, जसे की कीटनाशक, औद्योगिक कचरा, प्लास्टिक व इतर विषारी रासायनिक पदार्थ, मत्स्यांच्या प्रजननावर परिणाम करू शकतात. हे रासायनिक प्रदूषण शारीरिक आणि जैविक पातळीवर मत्स्यांवर हल्ला करते, ज्यामुळे अंडी अंडवलेली किंवा विकसित होणारी अंडी आणि लहान माशांची वाढ अडचणीत येते. समुद्रातील प्लास्टिक, रासायनिक प्रदूषण (जसे की कीटनाशक, औद्योगिक कचरा), आणि गाळ यामुळे समुद्रातील पर्यावरण बिघडत आहे. यामुळे माशांच्या अंडी आणि प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. याचे परिणाम म्हणून मासे कमी होतात, ज्यामुळे मासेमारीचे उत्पन्न घटते.
मासेमारी मत्स्य व्यवसाय अत्यंत धोक्याच्या वळणावर
रायगड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे काही मासेमारांनी आपल्या मासेमारी नौका इतर डिझिटल आधुनिक मासेमारीस फिरवण्याची तयारी दर्शविण्याच्या मार्गावर आहेत.मासे कमी होऊन त्यांच्या पुनर्निर्माण क्षमता कमी होईल. जास्त मासेमारीमुळे काही माशांच्या प्रजाती लवकरच लुप्त होण्याची शक्यता आहे, आणि त्यांच्या पर्यावरणीय संतुलनावर गंभीर परिणाम होईल.
पूर्व सरकारने कित्येक तालुक्यात औधौगिकीकरणाला चालणा देण्यासाठी एमआयडीसीसारखे प्रकल्प छोट्या मोठ्या कंपन्या कारखाने पारित केले. येथील सांडपाणी प्रदूषित अशुद्धपाणी शुद्ध न करता तसेच प्लास्टिक कचरा सर्रास खाड्यांमार्फत समुद्रात येत असल्यामुळे जंगले ही नष्ट होत आहेत. तसेच खार जमिनी येथे ही प्रदूषणामुळे उत्पन्नात मोठी घट होते यामुळे कर्ज बाजारी मासेमार देशोधडीला लागले आहेत.
षडयंत्र म्हणजे जातीपातीत परिवर्तन झाल्यामुळे काहींना विदेशातून गुप्त रसम येत आहे. त्यात मत्स्य व्यवसाय मत्स्योधोग बोट बांधणी हे प्रकार सर्रास रत्नागिरी व गुजरात येथील मंगलोर येथे राजरोस चालू आहेत. त्यामुळे हे सरकार या प्रसंगाचा सहानुभूतीपूर्वी योग्य अभ्यास करून ( कोळी समाजास ) योग्य न्याय मिळवून देईल या आशेवर जगत आहे.
हे ही वाचा :
पुण्यात आढळले Guillain Barre Syndrome चे संशयित रुग्ण, काय आहेत लक्षणे? Pune
Davos मध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट, पहिला करार राज्यातील Gadchiroli साठी