Friday, December 1, 2023

Latest Posts

WESTERN RAILWAY: ओव्हरहेड वायर तुटली, दुरुस्ती होऊनही गाड्या उशिराने

लोकल फेऱ्या रद्द केल्यामुळे स्थानकांवरील गर्दी वाढल्याचे दिसून येत होते. त्यामुळे पश्चिम रेल्वेने 316 लोकल फेऱ्या रद्द केल्या होत्या त्यापैकी 112 ट्रेन पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे

पश्चिम रेल्वेच्या (WESTERN RAILWAY) डहाणू (DAHANU) वानगाव स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेचा कोळंबा झाला आहे. याचा परिणाम उपनगरीय सेवांबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्यांवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या दुरुस्तीचे काम झालं असल्याची माहिती मिळाली असून लोकल गाड्या 40 ते 45 मिनिटे उशिराने धावत आहेत. दरम्यान, डहाणूला डाऊन लाईनच्या ओव्हरहेड (OVERHEAD WIRE) वायर तुटल्याने आज वाणगाव ते डहाणू दरम्यान संध्याकाळपर्यंत लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. डहाणूला डाऊन लाईनच्या ओव्हरहेड वायर तुटल्याने आज वाणगाव ते डहाणू दरम्यान केळवे रोड (KELAVE ROAD) पालघर (PALGHAR) बोईसर (BOISAR) येथून लोकल सोडण्यात येणार आहेत. बोईसर ते दिवा (BOISAR TO DIVA) ही गाडी आज रद्द करण्यात आली आहे. सध्या दुरुस्तीचे काम सुरू असून 40 ते 45 मिनिटे रेल्वे उशिराने धावत आहेत. उमरोळी (UMROLI) स्थानकात कुठलीही पॅसेंजर थांबत नसल्याने आज झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे उमरोळी स्थानकात वलसाड गाडीचा थांबा द्यावा, ही विनंती करण्यात आली होती ती प्रशासनाकडून आज झालेल्या घटनेमुळे मान्य करण्यात आली आहे.

सध्या पश्चिम रेल्वेच्या मार्गावर खारगाव ते गोरेगाव (KHARGAON TO GOREGAON) दरम्यान सहाव्या रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी 29 दिवसांचा ब्लॉक (MEGABLOCK) सुरू आहे. त्यात दिवसाच्या 316 फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून प्रवासांचे हाल झाले होते. लोकल फेऱ्या रद्द केल्यामुळे स्थानकांवरील गर्दी वाढल्याचे दिसून येत होते. त्यामुळे पश्चिम रेल्वेने 316 लोकल फेऱ्या रद्द केल्या होत्या त्यापैकी 112 ट्रेन पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक त्यात आता ओव्हरहेड वायर तुटल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यात थोडासा दिलासा मिळावा आणि गर्दीमुळे प्रवचनचे हाल होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेने 112 लोकल पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा : 

राज्यातील ज्वलंत प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवा, नाना पटोले

MARATHA RESERVATION: मराठा आरक्षणाच्या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर सर्व पक्षांची बैठक

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss