spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

सासूच्या काट -कारस्थानाने संसार मोडला म्हणून हत्या; आधी सासूला पेठवलं नंतर स्वतःला पेटवून घेतलं

मुंबईच्या मुलुंडमधून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. सासूमुळे संसार मोडला या रागातून एका व्यक्तीने आपल्या सासूला पेटवून देत तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने आधी सासूला हातोडीने मारले त्यांनतर पेट्रोल आणि थिनर टाकला आणि पेटवून घेतले. मग स्वतःला देखील पेटवून घेत आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी ही घटना घडली मात्र तेव्हा पोलिसांना याचा अंदाज नव्हता. पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा जावई आणि सासूमधील वादामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबी दाजी उसरे (वय 72) असे मृत महिलेचे नाव आहे. कृष्णा अटनकर (वय 59) हा बाबी उसरे यांचा जावई होता. कृष्णा अटनकर आणि बाबी उसरे यांच्या मुलीचे लग्न झाले होते. कृष्णा अटनकर आणि त्यांच्या पत्नीची अनेकदा भांडणे व्हायची. याच कौटुंबिक कलहाला कंटाळून कृष्णा अटनकर यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती. या दोघांचा दहा वर्षांपूर्वी घटस्फोट (Divorce) झाला होता. यासाठी आपली सासू बाबी उसरे कारणीभूत असल्याचा राग कृष्णा यांच्या मनात होता.

कृष्णा हा ड्रायव्हर होता. कृष्णा आणि त्याच्या पत्नीचा दहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. संसार मोडल्यानंतर कृष्णाची माजी पत्नी मुलुंड येथील आपल्या आईच्या घरी राहायला गेली होती. ती आपल्या 20 वर्षांच्या मुलासोबत तिकडे राहत होती. कृष्णा अनेकदा त्यांना भेटायला मुलुंडला जायचा. यावरुन कृष्णा आणि बाबी उसरे यांच्यात वाद झाला होता. तो सोमवारी सकाळी आठ वाजता बाबी उसरे यांच्या घरी गेला होता. बाबी उसरे यांना रुग्णालयात तपासणीसाठी जायचे असल्याने कृष्णा त्यांना आपल्या मिनी टेम्पोतून घेऊन निघाला होता. कृष्णाने घरापासून काही अंतरावर टेम्पो पार्क केला होता. नाणेपाडा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कृष्णा टेम्पोच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे. कृष्णाने बाबी उसरे यांना टेम्पोच्या मागच्या भागात बसवले होते.

बाबी उसरे टेम्पोच्या मागच्या भागात बसल्यानंतर कृष्णाने टेम्पोचा दरवाजा आतून लावून घेतला. त्यानंतर कृष्णाने अचानक हातोडी काढून बाबी उसरे यांच्या डोक्यावर तीन-चारवेळा मारले. त्यामुळे बाबी उसरे बेशुद्ध पडल्या. ही संधी साधून कृष्णा अटनकर याने बाबी यांच्या अंगावर पेट्रोल आणि थिनर ओतून त्यांना पेटवून दिले. त्यानंतर कृष्णाने स्वत:च्या अंगावरही पेट्रोल आणि थिनर ओतून घेत आत्महत्या केली. या परिसरातून जाणाऱ्या एका व्यक्तीला टेम्पोतून आगीच्या ज्वाळा बाहेर निघत असल्याचे दिसले. त्याने अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवून टेम्पोचे दार उघडले तेव्हा आतमध्ये हातोडी, रॉकेलची बाटली,लायटर आणि बाबी व कृष्णा यांचे मृतदेह आढळले होते.

या प्रकरणी मुलुंडच्या नवघर पोलिसांनी सुरुवातीला अपमृत्यूची नोंद केली होती. बाबी उसरे आणि कृष्णा अटनकर या दोघांनी आत्महत्या केली असावी, असे पोलिसांना वाटले होते. मात्र, चौकशीनंतर हा हत्येचा प्रकार असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्यातील कलमात वाढ केली.

Latest Posts

Don't Miss