बदलापूर येथील शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. अत्याचार करणाऱ्या आरोपीचा अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटर करण्यात आला होता. तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना आरोपी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर 2024 रोजी एन्काऊंटर करण्यात आला होता. या घटनेनंतर राज्यभरात गदारोळ उठला, अनेकांनी या एन्काऊंटरचं स्वागत केलं तर विरोधकांनी एन्काऊंटर नसून ही हत्या असल्याचं म्हटलं होतं. अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सामोवारी सादर करण्यात आला. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचे न्यायालयात वाचन केले. त्यामध्ये, अक्षय शिंदेला बनावट चकमकीत ठार करण्यात आल्याचं अहवालात म्हटलं आहे. या अहवालावर आता अक्षय शिंदेच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.
अक्षयच्या आईने प्रतिक्रिया देताना माझा मुलगा निर्दोष असल्याचे म्हटले. माझा मुलगा निर्दोष होता त्याने गुन्हा केलाच नव्हता. ज्यांनी गुन्हे केलेले आहेत, कोर्टाने आदेश दिल्यानुसार त्यांना सजा भेटेल हेच माझं म्हणणं आहे. माझ्या मुलाने गुन्हा केलाच नव्हता, माझा मुलगा सत्य होता आणि हे सत्यच आहे. मी त्याची आई आहे, मला त्याच्यावर विश्वास आहे. माझ्या मुलावर बलात्काराचा आरोप टाकला होता, आणि त्यानंतर त्याचा एन्काऊंटर केला, त्या लोकांनी त्याला मारून टाकले, अशी भावनिक प्रतिक्रिया अक्षय शिंदेंच्या आईने दिली.
न्यायालयातील अहवालात निर्णयामुळे मला खूप आनंद झाला आहे, माझ्या मुलाने गुन्हा केलाच नव्हता, कोर्टाने त्या लोकांना सजा दिली आहे. माझा मुलगा सत्य होता, तर ते सत्यच झालं आहे. आम्हाला कुठेही काम मिळत नाही, आम्ही कल्याणमध्ये आहोत. अजूनही कल्याणमध्ये भीक मागून खात आहोत. कोर्टाने दिलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत असल्याचे अक्षय शिंदेच्या आईने म्हटले आहे.
हे ही वाचा :
सरकार स्थापनेवेळी एकनाथ शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता Sanjay Raut यांचा भाजपला टोला
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला नाराजी नाट्यामुळे स्थगिती