धुळे तालुक्यातील नगाव येथील आरोग्य केंद्राची व्यवस्था वाऱ्यावर सोडल्याचे समोर आले असून या ठिकाणी डॉक्टरांसह कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी सकाळी आठ वाजता आरोग्य केंद्रात उपस्थित राहणे बंधनकारक असताना तब्बल दीड तास होऊन मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचारी या ठिकाणी नसल्याचे समोर आले आहे.
कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या महिलांना तपासणीसाठी सकाळी आठ वाजता बोलवण्यात आले होते, मात्र साडेनऊ वाजल्यानंतर देखील या ठिकाणी डॉक्टर किंवा नर्स कोणीही उपलब्ध नव्हते. यामुळे ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे. या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील आता ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी दिनेश सोनवणे यांना या संदर्भात विचारणा केल्यास त्यांनी सांगितले की, दोन महिलांचे टाके हे ओले असल्याचे कबूल केले तसेच नगाव प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी कर्मचारी वेळेवर येत असल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली. मात्र लवकरच त्यांना या संदर्भात सक्तीच्या सूचना देणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
हे ही वाचा:
रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने शिवानी-अंबरचं केलं केळवण; कलाकारांनी शेयर केले फोटो