Namdev Dhasal death Anniversary : मराठी साहित्य विश्वातील एक क्रांतिकारी, विद्रोही कवी म्हणजे नामदेव ढसाळ. हे मराठी कवी, विचारवंत आणि दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक आणि बौद्ध-दलित चळवळीतील नेते होते. महानगरीय जीवनावर लिहिणारे आणि बोली भाषेत लेखन करणारे ते मराठीतले एक महत्त्वाचे लेखक होते. नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यातील कनेरसर शेजारच्या पूर या खेड्यात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे ते लहानपणीच वडिलांसोबत मुंबईला आले. मुंबईतील गोलपीठा या वेश्यावस्ती (कामाठीपुरा) असलेल्या भागातील झोपडपट्ट्यांमध्ये त्यांचे बालपण गेले. नामदेव ढसाळांनी अनेक वर्षे मुंबईत टॅक्सी चालवली. ढसाळांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा प्रभाव होता. त्यांनी काव्य, गद्य, वृत्तपत्रांतील स्तंभलेखन यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार मांडले. त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली.
नामदेव ढसाळांची दलित चळवळ
महाराष्ट्र आणि भारताला प्रभावित करणाऱ्या ‘दलित पॅंथर’ या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. या संस्थेची स्थापना त्यांनी इ.स. १९७२ मध्ये दलित चळवळीतील समवयस्क सहकाऱ्यांच्या व साहित्यिकांसह केली. कालांतराने या चळवळीत फूट पडल्यावरही ढसाळ हे दलित पॅंथरमध्येच राहिले मराठवाडा विद्यापीठ नामविस्तारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दलित चळवळीला त्याचे महत्त्वाचे योगदान आहे.
कविता संग्रह :
- आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शनी (१९७६)
- खेळ (१९८३)
- गोलपिठा (१९७२)
- तुझे बोट धरून चाललो आहे मी
- तुही इयत्ता कंची (१९८१)
- मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे
- मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (१९७५)
- या सत्तेत जीव रमत नाही (१९९५)
- मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे (निवडक कवितांचा संग्रह)
- गांडू बगीचा
- निर्वाणा अगोदरची पीडा
नामदेव ढसाळ आयुष्याची शेवटची अनेक वर्षे मायस्थेनिया ग्रॅव्हीज या दुर्धर आजाराने ग्रस्त होते. याशिवाय त्यांना कॅन्सरचा आजारही जडला होता. सोमवार १३ जानेवारी २०१४ रोजी त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवार, १५ जानेवारी २०१४ रोजी पहाटे चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. दादर चौपाटीवरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
हे ही वाचा :
मागील ५ वर्षात Best अपघातात किती नागरिक मृत्युमुखी? किती कर्मचारी निलंबित?
गृहमंत्री अमित शहांविषयीचे पवारांचे वक्तव्य राजकीय विद्वेषातूनच