गुजरात राज्यातील उंबरगाव येथील राहणारे, तसेच फॉरेस्ट ॲण्ड एन्व्हायरो क्रियेटर्स नामक पर्यावरणीय संस्थेचे संस्थापक राधाकृष्ण नायर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील वेगवेगळ्या राज्यात आजपर्यंत १२० मियावाकी पद्धतीने जंगल निर्मिती करण्यात आली आहे. नायर यांनी केलेल्या वनीकरणातील झाडांची उल्लेखनीय वाढ झाल्यामुळे भारतामध्ये मियावाकी फॉरेस्टला नवीन दिशा मिळाली आहे.
त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्वात मोठे मियावाकी फॉरेस्ट गुजरात राज्याच्या भूजिया डोंगरावर करण्यात आले. तसेच समुद्रकिनारी असलेल्या सर्वात मोठे जंगल गुजरात राज्याच्या नारगोळ येथे निर्माण करण्यात आले आहे. त्यांच्या कामगिरीने गुजरात सरकारसहित अनेक राज्यांकडून त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच वेगवेगळ्या राज्यांतील वनविभागाबरोबर त्यांनी अनेक प्रकल्प पूर्ण केले आहेत. राधाकृष्ण नायर यांची नासा येथे पर्यावरण परिषदेमध्ये चर्चा करण्यासाठी भारतातून निवड करण्यात आली आहे. ग्रीन हिरो ऑफ इंडिया अशी ओळखले जाणारे उंबरगाव येथील डॉ. राधाकृष्ण नायर यांची नासामधील पर्यावरण परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. ही परिषद पाच डिसेंबर २०२३ रोजी पार पडणार आहे.
हे ही वाचा :
प्रार्थना बेहेरेने शेअर केला चार जणांचा व्हिडिओ,प्रार्थना म्हणते ‘हीच माझी दिवाळी’
MAHARASHTRA: शरद पवारांना भेटायला नागरिकांची गर्दी