Friday, December 1, 2023

Latest Posts

NASHIK: सावधान! दिवाळीच्या मिठाईत होतेय भेसळ

अन्न औषध प्रशासनाने शहराच्या सिडको व अंबड भागातून ८४ हजार ११० रुपये किमतीचा ३९७ किलो बनावट पनीर साठा दोन ठिकाणाहून जप्त केला असून तातडीने नष्ट करण्यात आला आहे. अन्न औषध प्रशासनाला गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यानुसार ही कारवाई करण्यात आली. पथकाने ही कारवाई करताना अत्यंत खबरदारी घेतली होती. गुरुवार ८ नोव्हेंबर रोजी ६.३० वाजेपासून सिडको येथे सापळा रचण्यात आला होता. गुप्त माहितीच्या आधारे विराज एंटरप्रायजेस, दुर्गा मंदिरच्या मागे, त्रिमुर्ती चौक, सिडको, नाशिक या ठिकाणी तपासणी केली असता पनीरमध्ये खाद्य तेलाची भेसळ असल्याचा संशय आला होता. त्यावरुन १६ हजार २८० रुपये किमतीचा सुमारे ७४ किलो साठा जप्त करण्यात आला. हा साठा नष्ट करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई गुरुवार ९ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. ही कारवाई सकाळी ७.३० वाजता करण्यात आली. अंबड येथील साई एंटरप्रायजेस, साईग्राम कॉलनी, उपेंद्रनगर पाण्याच्या टाकीजवळ, या दुकानाची तपासणी केली असता या ठिकाणी पनीरमध्ये खाद्यतेलाची भेसळ असल्याचा संशय आला. त्यावरुन ६७ हजार ८३० रुपये किमतीचा ३२३ किलो किलो साठा जप्त करण्यात आला. हा सर्व साठा नष्ट करण्यात आला आहे. दोन्ही पनीर हे अन्ननमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषकांकडे पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच विश्लेषण अहवालाच्या अनुषंगे अन्न सुरक्षा मानके कायदयाअंतर्गत पुढील आवश्यक कारवाई करण्यात येणार आहे, ही कारवाई, सहायक आयुक्त (अन्न) मनीष सानप व विनोद धवड यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) अविनाश दाभाडे, वाहनचालक निवृत्ती साबळे यांच्या पथकाने केली आहे. सह आयुक्त (नाशिक विभाग) संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. नागरिकांनी दुधापासून तयार झालेली मिठाई खरेदी करतांना खरोखर त्यामध्ये दुध, खवा, मलई किंवा इतर दुग्धजन्य पदार्थापासून तयार केलेले आहेत किंवा कसे याची खात्री करुनच खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या दोन्ही कारवाया करताना अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. गेल्या काही दिवसापासून या दुकानाच्या मागावर आमचे पथक होते. उत्पादन सुरु असताना ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती सह आयुक्त मनीष सानप यांनी दिली.

हे ही वाचा : 

दिवाळीत तयार झाल्यानंतर फोटोशूटसाठी कसे फोटो काढायचे, तर करा ‘या’ सहा टिप्स

आजचे राशिभविष्य,१० नोव्हेंबर २०२३;नशिबावर हवाला ठेवून न राहता…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss