आज अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीचे निवडणुका पार पडत आहेत नाशिक जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून अशातच इगतपुरी तालुक्यात निवडणुकीदरम्यान राडा झाल्याचे पाहायला मिळाले. इगतपुरी तालुक्यातील धारगाव ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतीसाठी आज सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. अर्ज माघारी नंतर प्रत्यक्षरीत्या ४३ ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या २०० जागांसाठी आणि ४४ ठिकाणी सरपंच पदासाठी लढत असणार आहे.
या दरम्यान इगतपुरी तालुक्यातील घारगाव ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान राडा झाला आहे. रात्री धारगाव ग्रामपंचायतच्या दोन महिला उमेदवार सदस्यांचे पती आणि समर्थकांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारगावमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इगतपुरी तालुक्यातील १५ गावातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुक सुरु आहेत. अनेक पुढाऱ्यांनी उमेदवारांची मनधरणी करत विनवणी करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माघार घेण्याची विनंती केली. मात्र उमेदवार ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आल्याने पुढाऱ्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे दिसून आले. यास तालुक्यातील धारगाव येथील नऊ जागांपैकी सात जागा बिनविरोध झाल्या असून दोन उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. याच गावात रात्री उशिरा तुंबळ हाणामारीची घटना समोर आल्याने खळबळ उडाली.
नाशिक जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक तसेच १५ ग्रामपंचायत मधील सरपंच व सदस्यांच्या १८ रिक्त जागांसाठीच्या प्रचाराचा धुरळा शुक्रवारी सायंकाळी पार पडला. या सर्व ठिकाणी रविवारी मतदान होत असून मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी हे साहित्य शनिवारी मतदान केंद्राकडे रवाना झाले. जिल्ह्यामध्ये ४८ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. अर्ज माघारीनंतर ४३ ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या २०० जागांसाठी तसेच ४४ ठिकाणी थेट सरपंच पदासाठी लढत होणार आहे. याव्यतिरिक्त १६ ग्रामपंचायत मध्ये सदस्यांसाठीच्या १५ तसेच सरपंचांच्या ३ अशा एकूण १८ जागांकरिता पोट निवडणुका होणार आहेत.
हे ही वाचा :
AJIT PAWAR यांनी मुख्यमंत्री व्हावे, मातोश्रींची इच्छा
तुम्हाला मिळणाऱ्या Diwali Bonus ची सुरुवात नेमकी कशी झाली? Diwali 2023