Nashik: नाशिक -पुणे रोडवरील काठे गल्ली परिसरामध्ये एक धार्मिकस्थळ आहे. नाशिकमधील या धार्मिक स्थळावरुन वातावरण तापले आहे. हे अनधिकृत धार्मिक स्थळ पाडण्यात यावे अशी मागणी हिंदूत्ववादी संस्थांकडून केली जात आहे. काठे गल्ली सिग्नललगतच्या रस्त्यावरील अनधिकृत धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम शनिवारी सकाळी महानगरपालिकेचे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून सुरू केली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरातील आठ मार्गांवरील वाहतूक पूर्णत बंद करण्यात आली आहे. तसेच काठेगल्ली सिग्नल व परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक जणांना एकत्रित जमण्यास प्रतिबंध केला आहे. द्वारका, काठे गल्ली, भाभानगरकडून जाणारे मार्ग व सभोवतालच्या परिसरात मोठा फौजफाटा तैनात केल्यामुळे या भागास पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
मागील २५ वर्षापासून हे प्रकरण सुरु असून वर्षानुवर्षे हिंदूत्ववादी संघटना यासाठी पाठपुरावा करत होती. आता मात्र महापालिकेने (Nashik NMC) अनधिकृत धार्मिक स्थळ हटवले नाही म्हणून हिंदुत्ववादी संघटनानी आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर आता काठे गल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या कारवाईला महापालिका प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे.त्यामुळे हा मुद्दा नाशिकमध्ये जोरदार तापण्याची शक्यता होतेय काठे गल्ली परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळ उभारण्यात आल्याचा हिंदुत्ववादी संघटनांनी आरोप करण्यात आला होता. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काठे गल्ली परिसरात पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे या परिसराला छावनीचे स्वरुप आले आहे.
काठे गल्ली सिग्नलकडून नागजी चौक, मुंबई नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर हे अनधिकृत धार्मिक स्थळ आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेने पोलिसांच्या सहकार्याने पूर्वतयारी करीत नियोजन केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठी कुमक तैनात केली. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या विरोधात आंदोलनासाठी काठे गल्ली चौकात एकत्रित जमण्याचे संदेश समाजमाध्यमांवरून प्रसारित झाले. तर विशिष्ट गटांनी या आंदोलनास विरोध करण्याचे संदेश प्रसारित केले. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी उपरोक्त भागात जमावबंदी केली. काठे गल्ली व अन्य परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक जणांचा जमाव करण्यास मनाई केली. या दिवशी परिसरात कोणत्याही मोर्चास व आंदोलनास परवानगी देण्यात आलेली नाही. भारतीय नागरी सुरक्षा संहितेतील कलमांन्वये नाशिक परिमंडळ एकमधील उपरोक्त भागात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र होण्यास प्रतिबंध करण्यात आला. ज्या भागात ही कारवाई सुरु आहे, तिकडे जाणारे सर्व रस्ते लोखंडी जाळ्या लावून बंद करण्यात आले. कोणालाही या भागात प्रवेश दिला गेला नाही. सभोवतालच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ये-जा करणे अवघड झाले. मोहीम पूर्ण होईपर्यंत दुकाने व आस्थापना बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे.
आठ मार्ग वाहतुकीसाठी सकाळी सहा वाजेपासून बंद करण्यात आले. यात पुणे महामार्गावरील द्वारका चौक-नाशिकरोड रस्ता, मुंबई-आग्रा महामार्गावरील संतोष टी पॉइंटकडून द्वारका चौकाकडे येणारा मार्ग, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅककडून सेवा रस्ताने मुंबई नाक्याकडे येणारी वाहने, सारडा सर्कलकडून द्वारकाकडे जाणारी आणि मुंबई नाकाकडू द्वारका चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात आला. या शिवाय राघोजी भांगरे चौक ते साहिल लॉन्स मार्ग, नागजी चौक ते काठेगल्ली सिग्नल आणि उस्मानिया चौक ते मुरादबाबा दर्गा या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. या मार्गांवरून ये-जा करणारी वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. पोलिसांनी जमावबंदी लागू केला असताना काही विशिष्ट समुदायाने एकत्र येत जमावबंदीचे उल्लंघन केले आहे. नाशिकमधील हा वाद चांगलाच पेटला असून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.
Akshata Apte: छावा चित्रपट मराठीत का केला नाही? – अभिनेत्री अक्षता आपटे
Follow Us