नाशिक (Nashik) जिह्यात बेकायदेशीररित्या दारू भाट्या (llegel Liqour) चालवल्या जात आहेत. यांवर कारवाई करण्याची मोहीम नाशिक पोलिसांनी राबवली आहे. यात महिला पोलीस गावागावात जाऊन डोंगर दर्यातून या हातभट्या शोधून त्याच्यावर कारवाई करत आहेत. ज्या ठिकाणी गावठी हातभट्ट्या सुरु आहेत तिकडे महिला पोलीस जाऊन त्या उध्वस्त करून टाकत आहेत. त्याच्या या कामाचे संपूर्ण जिह्यात कौतुक होत आहे.
नाशिक जिह्ल्यातील ग्रामीण आणि डोंगराळ भागात बेकायदेशीररित्या हातभट्या चालवल्या जात आहेत. या शोधासाठी ग्रामीण पोलिसांनी चार पथक तयार केली आहेत त्यामध्ये महिला पोलिसांचा देखील समावेश आहे. जागतिक आदिवासी दिनाचे अवचित साधून या सर्व महिला पोलीस मोहिमेसाठी पुढे आल्या आहेत. मागच्या तिने आठवड्यामध्ये महिला पोलिसांनी ग्रामीण भागातील ३२ छुपे अड्डे उद्धवस्त केले आहेत. तर ३३ संशयतांवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्व महिला पोलीस अंमलदार हातभट्टी व्यवसायांच्या निर्मूलनासाठी पुढे आल्या आहेत. नाशिक जिह्ल्यात इगतपुरी (Igatpuri), पेठ, त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) भागात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ३३ आरोपींविरुद्ध मुंबई दारू बंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमध्ये आजवर ११ लाख ५४ हजार १७० रुपयांची दारू, रसायन आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. महिला पोलीस या कारवाईसाठी ग्रामीण पोलिसांना मदत करत आहेत.
नाशिक ग्रामीण पोलिसांची महिला पथक यापुढेही काम करतील तेव्हा जिह्ल्यातील पोलिस पाटलांनी त्यांना आवश्यक ती मदत देण्याचं सहकार्य करावे असे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण पोलिसांकडून अश्या सर्व मोहीमा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यासाठी पोलिसांकडून एक हेल्पलाईन नंबर सुद्धा देण्यात आला आहे. हेल्पलाईन क्रमांक ६२६२ २५६६३६ या क्रमांकावर सदर महिला अंमलदारांच्या कामगिरीस हातभार लावावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी ०६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत अमली पदार्थ विरोधी अभियान राबवले होते. या कालावधीत १४ कारवाया झाल्या असून ११ जणांविरुधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना, ‘या’ १३ जणांचा समावेश…
एकनाथ शिंदेनी दिले ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ला समर्थन
एक देश , एक निवडणूक मोदींचा नवा नारा