‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट’द्वारे काल २५ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘स्वागत आणि सत्कार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एनसीआय’ परिवाराशी संवाद साधला. यावेळी ‘एनसीआय’चे वैद्यकीय संचालक डाॅ. आनंद पाठक यांच्या केबिनचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘एनसीआय’चे अध्यक्ष सुनील मनोहर, डाॅ.वैद्यकीय संचालक आनंद पाठक आणि ‘एनसीआय’चे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
‘एनसीआय’ सातत्याने प्रगती करत आहे. मला अनेकदा लोक भेटतात, त्यावेळी ‘एनसीआय’मध्ये उत्तम उपचार केले जातात, ‘एनसीआय’मुळे आमच्या कुटुंबातील व्यक्तीची तब्येत चांगली झाली, ‘एनसीआय’मध्ये आम्हाला चांगली वागणूक मिळाली, असे सांगतात, तेव्हा आनंद वाटतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एनसीआय’ करत असलेल्या सेवाकार्याचे कौतुक केले. ‘एनसीआय’ची टीम संस्थेला प्रत्येक दिवशी नव्या उंचीवर घेऊन जात असून ही फक्त सुरुवात आहे, आपल्याला ‘एनसीआय’ला आणखी पुढे न्यायचे आहे. देशातील प्रिमीयम संस्था म्हणून ‘एनसीआय’चे नाव घेतले जावे, हे आपले ध्येय आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. जगात कर्करोगावर जे उपचार केले जातात, ते ‘एनसीआय’मध्ये, सामान्य माणसालादेखील उपलब्ध व्हायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच यासाठी ‘एनसीआय’ परिवाराची भूमिका महत्त्वाची असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
तसेच, कर्करोगावरील उपचार अनेक दिवस, महिने चालतात, हे लक्षात घेऊन ‘एनसीआय’कडून रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अतिशय चांगल्या निवासाची व्यवस्था लवकरच करण्यात येत असल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. ‘एनसीआय’ने लोकसेवेच्या कार्यात गती घेतली असून त्यात कधीही खंड पडणार नाही. ‘एनसीआय’ सेवा प्रकल्प असून सेवा भावना कायम राहिली पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. तसेच, या सेवा कार्यात खारीचा वाटा उचलण्याचा माझा प्रयत्न असेल, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘एनसीआय’ परिवार आपले घर असल्याचे म्हणत इथे होणारा सत्कार अधिक मौल्यवान असल्याची भावना व्यक्त केली. तसेच, सुनील मनोहर यांनी सारगर्भित मनोगत मांडले. सुनील मनोहर यांनी आम्हाला जिंकले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
बीड जिल्यात १० महिन्यात तब्बल ३६ खुणांची नोंद
धक्कादायक खुलासा ! कल्याण अत्याचार प्रकरणी बायको आणि मित्रानेच केली मदत
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.