spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

नव्या वर्षातली नवी खुशखबर; गॅस सिलिंडरचे दर होणार कपात

Gas Cylinder Price : ऑईल कंपन्यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी दिली आहे. गॅस सिलिंडरचे दर कपात करण्यात येणार आहे. नव्या वर्षाची सकाळ नवी खुशखबर घेऊन आली आहे.

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरची किंमत कमी करण्यात आली असून या निर्णयामुळे हॉटेल तसेच इतर व्यावसायिकांना चांगलाच फायदा होणार आहे. ऑईल मार्केटिंग कंपनीकडून ही घोषणा करण्यात आली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी १९ किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कपात करण्यात आले. ही घोषणा १ जानेवारी २०२५ पासून व्यावसायिक गॅस सिलिंडर १४.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. गेल्या वर्षी १ मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दर कपात करण्यात आल्यामुळे अद्याप कपातीचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

कोणत्या शहरात गॅस सिलिंडरचा दर किती?

प्रत्येक वर्षी ऑईल कंपन्या महिन्याच्या १ तारखेला गॅसचे दर नव्याने ठरवतात. यावेळीदेखील १ जानेवारी रोजी सिलिंडरचे नवे दर लागू करण्यात आले असून दिल्लीमध्ये १९ किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलिंडर १८०४ रुपयांना मिळणार, मुंबईत १७५६ रुपये, कोलकत्ता शहरात १९११ रुपये, तर चेन्नईत १९६६ रुपयांना मिळेल. याआधी दिल्लीत १८१८.५० होती. त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. मुंबईत एलपीजी सिलिंडरच्या दारात १६ रुपयांनी घट झाली आहे. मुंबईत एलपीजी सिलिंडर ग्राहकांना १७७१ रुपयांऐवजी १७५६ रुपयांना मिळेल. याआधी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ झाली होती. महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना झटका बसला होता. पण आता त्याच व्यावसायिक ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss