Nitesh Rane : मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आपल्याच सरकारमधील मंत्र्यांना पत्र लिहून नियम बदलण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या ११ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरु होणार आहे. तर २१ फेब्रुवारीपासून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. परीक्षांचं वेळापत्रक, हॉल तिकीट आणि परीक्षा केंद्रासह सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या सगळ्यात नितेश राणे यांनी बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नको, अशी मागणी करत शिक्षणमंत्री दादा भुसेंना पत्र लिहिले आहे.
नेमकं पत्रात काय म्हणाले नितेश राणे?
आता राज्यात इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या परीक्षा असणार आहेत. यावर विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार म्हणजे कॉपी होऊ नये यासाठी कॉपीमुक्त परीक्षा होणे खूप गरजेचे आहे. शासन स्तरावरून वेळोवेळी सूचना दिल्या जातात. जर परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला तर एखादी परीक्षार्थी बुरखा घालून इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा उपयोग करुन परीक्षा देत आहे किंवा नाही हे तपासणे शक्य होणार नाही. सामाजिक तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनेक विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागेल, असे नितेश राणे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.
लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन – शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०१५ ते सोमवार, १० फेब्रुवारी २०२५
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा – शुक्रवार, दि.२१ फेब्रुवारी २०२५ ते सोमवार दि १७ मार्च, २०२५
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन – सोमवार, ०३ फेब्रुवारी २०२५ ते गुरूवार २० फेब्रुवारी २०२५
हे ही वाचा :
Mobile Forensic Van सुरू करणारे Maharashtra देशातील पहिले राज्य- CM Devendra Fadnavis