मागील अनेक वर्षांपासून शेगाव शहरातील तालुका क्रीडा संकुला वरील अतिक्रमण काढण्याला मुहूर्त मिळालेला असून, उद्या मंगळवारी क्रीडा संकुलावरील १९२ झोपडपट्ट्यांवर बुलडोजरची कारवाई होणार आहे. दुसरीकडे आधी पुनर्वसन नंतरच अतिक्रमण अशी मागणी करीत काहीही झालं तरी झोपडपट्टी सोडणार नसल्याचा पवित्रा येथील नागरिकांनी घेतलेला आहे. त्यामुळे उद्या अतिक्रमण धारक विरुद्ध प्रशासन असे खटके उडण्याची शक्यता आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहराच्या मध्यस्थानी असलेल्या मुरारका विद्यालयाजवळील तालुका क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर मागील अनेक वर्षांपासून विविध भागातून विस्थापित झालेल्या नागरिकांनी आपल्या झोपडपट्ट्या ठरल्या आहेत. दरम्यान, येथील नागरिकांना घरकुले मिळावी, त्यांचे पुनर्वसन व्हावे अशी मागणी या भागातील नागरिकांनी लावून ठेवलेली आहे. मात्र, प्रशासनाने आता क्रीडा संकुलावरील अतिक्रमणावर न्यायालयाच्या निर्देशानुसार बुलडोझर चालवण्याचा निर्णय केलेला आहे.
त्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, तालुका क्रीडा अधिकारी तथा तहसीलदार याशिवाय नगरपालिकेचे अधिकारी यांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने उद्या मंगळवारी येथील क्रीडा संकुलाचे क्रीडांगण अतिक्रमण मुक्त करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी उद्या ३०० पोलिसांचा ताफा व विविध उच्चस्तरीय अधिकारी यासाठी शेगाव ठाण मांडून राहणार आहे. दुसरीकडे मागील वीस वर्षांपासून क्रीडांगणावर राहत असल्याने शासनाच्या नियमानुसार आधी पुनर्वसन करा नंतरच आम्हाला विस्थापित करा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केलेली आहे. काहीही झाले तरी जागा सोडणार नाही असा पवित्रा या भागातील नागरिकांनी घेतलेला आहे.
हे ही वाचा:
आरोपीला फाशी दिली तरी चालेल पण घटना सत्य आहे का नाही हे तपासायला पाहिजे,आरोपीच्या भावाचं वक्तव्य
BMC चा पेपर फुटला? पेपरफुटी घोटाळा Raj Thackeray यांच्या कोर्टात जाणार