Friday, December 1, 2023

Latest Posts

NOVEMBER: आर्थिक नियमांत होणार बदल, काय होईल परिणाम?

सरकारने लॅपटॉप (Laptop), टॅब्लेट (Tablet), वैयक्तिक संगणक (Personal Computer) आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या (Electronic Gazettes) आयातीवर ३० ऑक्टोबरपर्यंत सूट दिली होती.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला देशात अनेक आर्थिक नियम बदलतात. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. १ नोव्हेंबरपासून अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. १ नोव्हेंबरपासून अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहेत, ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल. १ नोव्हेंबर २०२३ पासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या बजेटवर होईल. एलपीजी सिलेंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित केल्या जातात. व्यावसायिक आणि घरगुती सिलेंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला जाहीर केल्या जातात. याशिवाय ई-इनव्हॉइस आणि काही उत्पादनांच्या आयातीचे नियमही बदलणार आहेत.

गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder) किंमती बदलण्याची शक्यता आहे. दर महिन्याला पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमती निश्चित केल्या जातात. तेल कंपन्यांच्या मते, गॅस सिलेंडरच्या किंमती वाढू किंवा कमी होऊ शकतात. तसेच, किमतींमध्ये कोणताही बदल न होता कायम राहण्याचीही शक्यता आहे. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरनुसार (National Informatics Centre) १०० कोटी किंवा त्याहून अधिक उलाढाल असलेल्या व्यवसायांना १ नोव्हेंबरपासून ३० दिवसांच्या आत ई-चलन पोर्टलवर जीएसटी (GST) चलन अपलोड करावे लागेल. वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी (GST) प्राधिकरणाने सप्टेंबरमध्ये हा निर्णय घेतला होता. एनआयसीनुसार, १०० कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या उद्योगपतींना १नोव्हेंबरपासून ३० दिवसांच्या आत पोर्टलवर ई-चलान अपलोड करावे लागणार आहे.

सरकारने लॅपटॉप (Laptop), टॅब्लेट (Tablet), वैयक्तिक संगणक (Personal Computer) आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या (Electronic Gazettes) आयातीवर ३० ऑक्टोबरपर्यंत सूट दिली होती. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange) म्हणजेच बीएसईनुसार १ नोव्हेंबरपासून इक्विटी डेरिव्हेटिव्ह विभागावरील व्यवहार शुल्क वाढवतील. हे बदल S&P BSE सेन्सेक्स पर्यायांवर लागू होतील. व्यवहाराच्या वाढत्या खर्चाचा व्यापाऱ्यांवर आणि किरकोळ गुंतवणूकदारांवर नकारात्मक परिणाम होईल.

हे ही वाचा : 

राज्यातील ज्वलंत प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवा, नाना पटोले

World Cup 2023, भारताच्या विजयाने सेमीफाइनलचा मार्ग झाला मोकळा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss