spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

आता शिवसेनेला संपवण्यासाठी नवा ‘उदय’ येईल, Vijay Wadettiwar यांचे Mahayuti वर ताशेरे

पालकमंत्री पदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे हे दरे गावी गेले असून ते नाराज असण्यावरून आता प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

१८ जानेवारीला पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली. आता पालकमंत्र्यांच्या पदावरून सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यावरूनच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे. पालकमंत्रीपदाच्या वादाबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले की, ही सगळी परिस्थिती पाहून जनताच सरकारला स्थगिती देईल असं वाटायला लागलं आहे. काय सावळा गोंधळ सुरु आहे, काय ड्रामा सुरु आहे, एवढं बहुमत असताना आपसात मतभेद वाढले, सत्तेसाठी पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा सुरू आहे. महाराष्ट्राने शर्मेने मान खाली घालावी अशी स्पर्धा सुरू आहे. ‘भांडा सौख्यभरे’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. आज पालकमंत्री बदलले, उद्या मंत्री बदलायची पाळी येईल, परवा उपमुख्यमंत्री बदलायची वेळ येईल, त्यानंतर मुख्यमंत्री बदलायची वेळ येईल आणि महाराष्ट्राचं वाटोळं करा, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

पालकमंत्री पदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे हे दरे गावी गेले असून ते नाराज असण्यावरून आता प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. नाराजी दाखवून काही पदरात मिळेल हा प्रयत्न सुरू आहे. शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे. शिंदे यांची गरज संपली का? उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं, आता शिंदेंना संपवून नवीन ‘उदय’ पुढे येईल, तो उदय कुठला असेल, शिवसेनेच्या बाबतीत त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल, उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा, तो तुम्हाला दिसेल ही शक्यता नाकारता येत नाही, कारण काही उदय दोन्ही डग्ग्यावर हात मारून आहेत, संबंध चांगले करून ठेवले आहे ते उद्याच्या उदयासाठीच आहेत, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

आता दुःख करून काही मिळणार नाही, एक-एक ओबीसीचे मत घेऊन सत्तेवर आले. ओबीसीच्या नेत्यांना मात्र पद्धतशीरपणे एक-एकाला नेतृत्वहीन करायचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडे सुरू असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली.

हे ही वाचा : 

सरकार स्थापनेवेळी एकनाथ शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता Sanjay Raut यांचा भाजपला टोला

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला नाराजी नाट्यामुळे स्थगिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss