राज्यातल्या प्रार्थना स्थळांवर करणात आता सरकार कारवाई. कोणीही ५५ डेसिबलच्या नियमांचा उल्लंघन करणार त्याची परवानगी कायमची रद्द करण्यात येणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. भोंग्यांच्या आवाजाची तीव्रता तपासण्याचं काम हे पोलिस निरीक्षकाचं असून त्याची माहिती त्यांनी प्रदूषण नियंत्रण बोर्डला देणं गरजेचं आहे असं फडणवीस म्हणाले.
विधानसभेत चर्चासत्र सुरु असताना मशिदीवरील भोंग्यांमुळे होणार त्रास लक्षात घेत भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी मांडली आणि या लक्षवेधीला उत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. राज्यात कुठल्याही प्रार्थना स्थळावर भोंगे लावण्याची परवानगी पोलिसांकडून घ्यावी लागले. कायद्यानुसार, अधिक डेसिबलने हे भोंगे वाजत असतील तर प्रदूषण नियमक मंडळ कारवाई करतं. कुणालाही सरसकट भोंग्याची परवानगी देणार नाही. निश्चित कालावधीसाठी परवानगी दिली जाईल. त्यानंतर जर पुन्हा कुणाला परवानगी हवी असेल तर ती पोलिसांकडून नव्याने घ्यावी लागेल.
उल्लंघन केल्यास परवाना कायमचा रद्द केला जाणार?
विधासभेत चर्चासत्रा दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात जर कुणी 55 डेसिबल आणि 45 डेसिबलचे उल्लंघन केले जाईल त्याला पुन्हा कधीच परवानगी दिली जाणार नाही. भोंग्यांची जप्ती केली जाईल. या कायद्याचे पालन होत आहे की नाही याची जबाबदारी पोलिसांकडे असणार आहे. पोलिस निरीक्षकाने प्रत्येक प्रार्थनास्थळाला भेट देऊन तपासणी करावी तसेच प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये मीटर देण्यात आलं आहे. त्यानंतर जर कुणी उल्लंघन केलं जात असेल तर त्याची माहिती पहिला प्रदूषण नियंत्रण बोर्डला दिली पाहिजे. दुसऱ्या टप्प्यामध्ये अशा भोंग्यांना पुन्हा परवानगी दिली जाणार नाही.
मशिदींवरील भोंग्यावर कारवाई करण्यात यावी अशी याआधी अनेकदा मागणी करण्यात आली आहे. त्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आवाज उठवला होता. त्यानंतर काही प्रमाणात भोंग्यावर कारवाई करण्यात आली होती. पण नंतर पुन्हा एकदा ही कारवाई थंडावल्याचं दिसून आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडक नियम लागू केले आहे.
हे ही वाचा :
एकापाठोपाठ एक विरोधकांचे व्हिडीओ बाहेर, धसांनंतर आता Sandeep Kshirsagarअडचणीत नेमकं यामागे कोण?
Follow Us