spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

मनोज जरांगे पाटील येत्या २५ जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहेत. मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाचा भाव आणि धनगर मुस्लिम आरक्षण कसे देत नाहीत हे बघतोच, असे विधान मराठा आर्कषक आंदोलक मनोज जरांगे यांनी केले आहे.

मनोज जरांगे पाटील येत्या २५ जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहेत. मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाचा भाव आणि धनगर मुस्लिम आरक्षण कसे देत नाहीत हे बघतोच, असे विधान मराठा आर्कषक आंदोलक मनोज जरांगे यांनी केले आहे. काही लोक म्हणतात की आता पहिलं सरकार आहे, आरक्षण देतील का? पण आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याची.. होऊ द्या आता… पहिले हा दुसऱ्यांवर ढकलत होता ना, मी विरोध करत नाही, मी द्या म्हणतो. आता कळेल देतो की नाही ते, असे विधान करत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

मनोज जरांगे पाटील आज २५ डिसेंबरला परभणी आणि मस्साजोगला जाणार आहोत. मनोज जरांगे परभणीत सूर्यवंशी कुटुंबीयांची तर मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. त्यांनी २८ तारखेला बीड जिल्हयातील जनतेच्या वतीने मोर्चा ठेवलेला आहे. त्यातसुद्धा बीड जिल्ह्यातील जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. तसेच कोणाचे पण बाप येऊ द्या ते मॅटर मी दबू देत नाही. कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटणार नाही. सरकारला एकमेकांना मोबाईलचे फोन केलेले तपासायला एवढे दिवस लागतात का ? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

मनोज जरांगे पाटील येत्या २५ जानेवारी २०२५ पासून अंतरवलीमध्ये आमरण उपोषण सुरु करणार आहे. २५ जानेवारीच्या आत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा सरकारला भयंकर आंदोलन बघावे लागेल, असा इशारा मनोज जरांगेनी फडणवीस सरकारला दिलाय. तर २५ जानेवारीला राज्यभरात मराठ्यांनी अंतरवलीकडे यायचं. मराठ्यांची ताकद पुन्हा एकदा दाखवा. सर्वानी स्वतः हा मेसेज सोशल मीडियावर पोस्ट करा. हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचे आहे. माझं गाव माझी जबाबदारीप्रमाणे आपणच आपल्या गावात बैठक करायच्या आहेत. सर्वांनी पत्रिका छापायचा, प्रत्येक घरात जाऊन आमंत्रण द्यायचं. २५ जानेवारी २०२५ ला कोणीही लग्नाची तारीख धरू नये, त्या दिवशी वाहनेच मिळणार नाहीत, असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिले आहे.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss