spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

आता जीबीएस आजाराचं लोण संभाजीनगरपर्यंत, मोठी खळबळ

सर्वात आधी पुण्यात दुर्मिळ आजार गुलियन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण आढळून आले. त्यांनतर पुणे सह नांदेड, सोलापूर मध्ये GBS आजाराचे रुग्ण सापडून आले. आता या आजाराचं लोण छत्रपती संभाजीनगरपर्यंतदेखील पोहोचलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात जीबी सिंड्रोमचे 3 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 2 महिला आणि एका 10 वर्षीय मुलीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आहे. मात्र डॉक्टरांनी आवाहन केले आहे की नागरिकांनी घाबरून जाऊन नये पण सतर्क राहावे असे म्हंटले आहे.

 

संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दोन महिला आणि एका दहा वर्षीय मुलीला आजाराची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मागील वर्षभरात घाटी रुग्णालयात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांवर उपचार केले असल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी दिली. हा आजार कोरोना सारखा संसर्गजन्य नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये परंतु काळजी घेणे आवश्यक असल्यासही त्यांनी यावेळी सांगितले. या आजाराच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगरची आरोग्य यंत्रणा देखील आता अलर्ट झाली असून वेळ पडली तर वेगळा विलगीकरण कक्ष स्थापन करण्यासाठी वार्ड असल्याची माहिती यावेळी अधिष्ठाता यांनी सांगितले. दरम्यान या आजाराची लक्षणे आढळतात त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलय.

पुण्यातील नांदेडगाव परिसरात जीबीएस आजाराचे रुग्ण

पुण्यात सध्या GBS आजाराने दहशत निर्माण केली आहे. जीबीएसच्या फैलावासाठी दूषित पाण्याचा स्त्रोताला कारणीभूत मानलं जात आहे. पुण्यातील नांदेडगाव परिसरातही जीबीएस आजाराचे रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या सात तज्ज्ञांच पथक पुण्यात दाखल झालं आणि पाहणीकरण्यात आली.

अंगावर आजार काढू नका, सोलापूर महानगरपालिकेचे आवाहन

दरम्यान सोलापुरातही जीबीएसचे रुग्ण वाढत असून त्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका अलर्ट मोडवर आली आहे. अचानकपणे हाता – पायात , अंगात अशक्तपणा जाणवत असेल किंवा कोणतीही लक्षणे आढळल्यास अंगावर न काढता त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. तसेच जास्त काळ आलेला ताप, खोकला, उलट्या, जुलाब असा त्रास झाल्यास त्वरित आरोग्य केंद्रात चाचण्या करून घेण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही औषधोपचार न घेण्याचे आवाहन सोलापूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. जीबीएस हा आजार संसर्गजन्य नसल्यामुळे शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क रहा अशा सूचना महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

योग्य औषध उपचार केल्यास जीबीएस टाळता येऊ शकतो

यासंदर्भात डॉ. भूषण किन्होळकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. जीबीएसला घाबरून जाण्याची गरज नाही. योग्य काळजी घेतल्यास जीबीएस आजारापासून आपण दूर होऊ शकतो. बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ल्यास, तसेच बाहेरचे पाणी प्यायल्यास जीबीएसची लागण होण्याची शक्यता जास्त आहे, अशी माहिती डॉ. भूषण किन्होळकर यांनी दिली. या आजारात अशक्तपणा, थकवा जाणवणे शिवाय श्वास घेण्यास त्रास होणे अशी काही लक्षणं आहेत. मात्र योग्य औषध उपचार केल्यास जीबीएस टाळता येऊ शकतो असेही डॉक्टरांनी नमूद केलं.

हे ही वाचा : 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss