सिद्धिविनायकी मंदिरासंबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. ड्रेसकोड संदर्भात सिद्धीविनायक मंदिराकडून न्यासाकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं आहे. सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले तरच त्यांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे,अन्यथा प्रवेश दिला जाणार नाही, असं न्यासाकडून सांगण्यात आलं आहे. असे पत्र मंदिर समितीकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. सिद्धीविनायक मंदिरातील ड्रेसकोड पुढच्या आठवड्यापासून लागू करण्यात येणार आहे. ही माहिती ट्रस्टचे सदस्य राहुल लोंढे यांनी दिली.
सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू
सिद्धिविनायक मंदिरात पुढच्या आठवड्यापासून लागू करण्यात आला आहे. भारतीय संस्कृती जपणं, मंदिरात येणाऱ्या भक्तांनी शालीनता आणि मंदिराचं पावित्र्य जपणारा पेहराव करावा,असे मंदिर न्यासाने सांगितले आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी येताना मंदिराचं पावित्र्य नष्ट होणार नाही अशा प्रकारचा पेहराव भाविकांचा असावा तर तोकड्या कपड्यांवर बंदी असणार आहे असं ट्रस्टच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
नेमका पेहराव कसा असावा
जो पेहराव कराल तो दुसऱ्याला लाज वाटणारा नसावा, म्हणजे दुसऱ्यांना लाजवेल असा किंवा संकोच वाटेल असा पेहराव नसावा. जे पुरुष किंवा महिला भाविक शॉर्ट्स कपड्यांमध्ये सिद्धीविनायक मंदिरात येतात त्यांना आता प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मंदिरातील पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. काही भक्तांच्या तक्रारी, सूचना न्यासाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळेच ड्रेस कोडबाबत सिद्धिविनायक न्यासाने हा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा :
Mobile Forensic Van सुरू करणारे Maharashtra देशातील पहिले राज्य- CM Devendra Fadnavis