spot_img
spot_img

Latest Posts

औरंगाबादमध्ये ओबीसी समाज आक्रमक, करणार अन्नत्याग आंदोलन

राज्यभरात मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटले आहेत. जालन्यात मराठा समाज आंदोलनाकर्ता बसला असताना त्याच्यावर पोलिसांनी लाठीमार केला.

राज्यभरात मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटले आहेत. जालन्यात मराठा समाज आंदोलनाकर्ता बसला असताना त्याच्यावर पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये अनेक पोलीस आणि आंदोलक जखमी झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरातून ठिकठिकाणी आंदोलन मोर्चा काढण्यात आले. पण आता मराठा आंदोलनाचा मुद्दा तापलेला असताना ओबीसी समाज देखील रस्त्यावर आला आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यास सगळीकडून विरोध होत आहे. ओबीसी समन्वय समिती औरंगाबादमध्ये अन्नत्याग करणार आहे. हे आयोजन रविवारी औरंगपुऱ्यातील संत सावता महाराज मंदिरात पार पडले. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर अन्नत्याग आंदोलन करण्याचे ठरले आहे.

रविवारी ओबीसी समन्वय समितीच्या वतीने माजी आमदार नारायणराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींमधील अधिकाऱयांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ओबीसींच्या विविध मागण्या आणि ओबीसींवर होणाऱ्या अन्यायासंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीत जनआंदोलन करण्याचे अधिकाऱ्यांनी ठरवले आहे. १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता क्रांती चौकात अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात ओबीसी समाजाने सहभागी व्हावे असे आव्हान समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी संबोधून ओबीसी प्रमाणपत्र देऊ नयेर्व जातीची जातनिहाय जन- गणना त्वरित करावी. आजतागायत मराठा समाजाला कुणबी (ओबीसी) म्हणून दिलेली जातींची प्रमाणपत्रे रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. ओबीसी, (व्हिजेएनटी, एसबीसी) विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत महागाई निर्देशांकानुसार वाढ करण्यात यावी. ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. ती त्वरित चालू करावी. सरकारी उद्योगांचे खासगीकरण थांबून सरकारी नोकऱ्यांच्या खासगीकरणाचा अध्यादेश तत्काळ रद्द करण्यात यावा, या सर्व मागण्या ओबीसी समाजाने केल्या आहेत.

संपूर्ण राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्यावर सोमवारी मुंबईत मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. त्यावर मुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले ‘ मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. मात्र, इतर कोणत्याही समाजाचा आरक्षण कमी न करता हे आरक्षण दिले जाणार आहे. मात्र, दोन समाजात वाद होईल असे कोणतेही निर्णय घेतले जाणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने आंदोलन करण्याची गरज नाही, कारण त्यांच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही ‘ असे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

रेशनवरील धान्याच्या मागणीसाठी आज मुंबईत महिलांचा मोर्चा

कोकणातील बारसू प्रकल्पाला येणार वेग

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss