राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मुंबईत ‘अभिजात मराठी भाषा दिन गौरव सोहळा २०२५’ मोठ्या दिमाखदार आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या सोहळ्यात पद्मभूषण मा. डॉ. राम सुतार, पद्मश्री मा. मधु मंगेश कर्णिक, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण मा. अशोक सराफ, मा. दिलीप वेंगसरकर, सयाजी शिंदे, वैशाली सामंत आणि मा. इंद्रनील चितळे यांना मराठी भाषेच्या वृद्धी आणि संवर्धनासाठी आपापल्या क्षेत्रातून दिलेल्या योगदानाबद्दल गौरविण्यात आलं. यावेळी पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन करत उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला.
सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. ‘मराठी भाषा गौरव दिन’ हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. त्यांच्या काव्यप्रतिभेने मराठी भाषा अधिक समृद्ध झाली असून, त्यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेच्या माध्यमातून मराठी साहित्याला नवे अलंकार चढवले आणि अनेक अमूल्य साहित्यकृतींची निर्मिती केली. ते मानवतेचे कवी होते, त्यांनी आपल्या साहित्यातून समाजाच्या विविध अंगांना स्पर्श केला. त्यांच्या पश्चात आता मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी भाषिकाने आपल्या खांद्यावर घ्यावी, असं आवाहन केलं.
महाराष्ट्रात मराठी भाषेच्या माध्यमातून स्वराज्य, स्वसंस्कृती आणि स्वचेतनेचा विस्तार घडून आला आहे. राज्यातील महिला सशक्तीकरण, औद्योगिक प्रगती, कृषी विकास आणि सामाजिक परिवर्तन यांसाठी मराठी भाषेनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राज्य शासनाकडून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. साहित्य प्रसार, भाषा विकास आणि संशोधनाला चालना देण्यासाठी तसंच साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक दर्जाचं मराठी भाषा भवन मुंबईत साकारलं जात आहे. हे भवन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक ठरेल. मराठी भाषा संपूर्ण जगभर पोहोचावी, हे आमचं ध्येय असून, प्रयत्नशीलतेच्या जोरावरच हे स्वप्न साकार करू, असा विश्वास दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्शांवर चालत जनसेवेच्या कार्यात सातत्यानं योगदान देत आहे आणि पुढेही देत राहील.
हे ही वाचा:
दत्तात्रय गाडेच्या मैत्रिणीला पुणे पोलिसांनी भोरमधून बोलावलं; धक्कादायक माहिती समोर
Follow Us