spot_img
spot_img

Latest Posts

१७ व्या दिवशी मनोज जरांगे यांनी उपोषण घेतले मागे

मागील १६ दिवसापासून मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी गावात आंदोलनासाठी बसले आहेत.

मागील १६ दिवसापासून मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी गावात आंदोलनासाठी बसले आहेत. पण आज त्यांनी उपोषणाच्या १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर ज्युस पिऊन उपोषण सोडले आहे. त्यांच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले आहे. सराटी गावात मुख्यंमत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री देखील उपस्थिती आहे. त्यानंतर मनोज जरंगे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण्याच्या मागणीसाठी सरकारला एक महिन्याचा कालावधी दिला आहे. त्यामुळे या काळात आम्ही आमचे आमरण उपोषण मागे घेणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. पण आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपोषण मागे घेणार असल्याची त्यांनी भूमिका मांडली होती. त्यामुळे आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यात गेले. त्यानंतर त्यांनी जरांगे सोबत चर्चा करून त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितले. मुख्यमंत्री यांच्या विनंतीनंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. विशेष म्हणजे आमरण उपोषण मागे घेतलं असले तरीही साखळी उपोषण मात्र सुरूच राहणार असल्याचं जरांगे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी सायंकाळी पाच वाजता अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी ते जाणार होते. याबात त्यांची सर्व तयारी झाली होती. पण ऐन वेळी मुख्यमंत्र्यांनी हा दौरा रद्द केला. तसेच पत्रकार परिषद घेऊन आमचे शिष्ट मंडळ मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अचानक रद्द झाल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा होऊ लागल्या.

Latest Posts

Don't Miss