बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यभरात सगळीकडे मोठ्या प्राणात रोष व्यक्त करण्यात येत आहे. आज मुंबईत मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू या दोन घनांमध्ये न्याय मिळावा यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आला आहे. सुरेश धस यांनी संतोष देशमुख हा प्रकरण लावून धरला आहे. या मोर्चा दरम्यान हा केळवण दानंजय देशमुख यांचे बंधू म्हणून नाही तर १४ कोटी जनतेच्या मनातील राग आहे. जे हत्या करणारे आहेत ते सर्व ज्या दिवशी फाशीवर जातील तेव्हा सर्व शांत होईल असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले सुरेश धस?
यात धनंजय देशमुख त्यांचे बंधू म्हणून नाही 14 कोटी जनतेच्या मनातील राग जे हत्या करणारे आहेत ते सर्व ज्या दिवशी फाशीवर जातील तेव्हा सर्व शांत होतील. सव्वा वर्ष झालं महादेव मुंडे यांचा खून करण्यात आलाय. त्यांचा आरोपी सापडत नाही. त्या बाईच्या डोळ्यात पणी आहे. तो मुलगा रडतोय त्याची चुक काय आहे. आकाचा किती प्रभाव तिकडच्या पोलीस वर होता हे कळतंय.
पुढे ते म्हणाले, खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडची सिटीस्कॅन तपासणी करण्यात आली. नियमाप्रमाणे जरी आरोपी असला नियमात जे सवलती दिल्या आहेत त्या घेण्याचा अधिकार आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत जो तपास चालू आहे. विश्वास आहे जी डिमांड केलीय उज्वल निकम यांची नियक्ती आणि पळून गेलेला आरोपी यात कुठलीही सवलत दिली जाणार नाही असेही धस म्हणाले.दरम्यान वाल्मीक कराडच्या संपत्तीवर जप्ती आणल्यानंतर एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही. आका बाका चॊका सर्वांच्या नावावर आहे. प्रॉपर्टी सवड्याच्या नावाने बावड्याच्या नावावर गेली. असंही सुरेश धस म्हणाले.
चौकशीची काय परिस्थिती
मुंबईतील मेट्रो सिनेमापासून ते आझाद मैदानपर्यंत मुंबईत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर या आंदोलकांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आणि त्या ठिकाणी सध्या चौकशीची काय परिस्थिती आहे, ती उघड करा यासाठी ही मागणी करणार असल्याचे समोर आले आहे. तसेच आज या आंदोलनाची पुढील दिशा ठरेल असे देखील सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा :